Karnataka Hindi-Kannada Row: दाक्षिणात्य राज्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंदीच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्र सरकारकडून हिंदी सक्ती केली जात असल्याचा आरोप दाक्षिणात्य राज्यांनी केलाय. दुसरीकडे आता कर्नाटकातील बंगळुरूमध्ये हिंदी आणि कन्नड भाषेवरून दोन महिलांमध्ये वाद झाला. महिलांमधला वाद इतका वाढला की तो थांबवण्यासाठी आजूबाजूच्या लोकांना हस्तक्षेप करावा लागला. बंगळुरूच्या नम्मा मेट्रो स्टेशनवर महिलांमध्ये झालेल्या जोरदार बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तिकीट काऊंटवर एका महिलेने कन्नड बोलण्यास नकार दिल्याने वाद सुरू झाला. एका महिलेने हिंदी बोलण्याचा आग्रह धरला तर दुसरी कन्नड बोलत राहिली. व्हायरल व्हिडिओमध्ये, दोन्ही महिला तिकीट काउंटरजवळ उभ्या राहून वाद घालताना दिसत होत्या. व्हिडिओमध्ये, बुरखा घातलेली महिला "तू मुख्यमंत्री आहेस का? तू मुख्यमंत्री आहेस का? इथून निघ" असं म्हणत होती. तर दुसरी महिला वारंवार "कन्नड, कन्नड" म्हणत होती.
त्यानंतर हिंदी भाषिक महिला, "तू सिद्धरामय्या यांची बायको आहेस का?" यामुळे ती महिला आणखी चिडते आणि दोघांमध्ये जोरदार वाद सुरू होतो. काही लोक हस्तक्षेप करतात आणि त्यांना बाजूला करतात.
दरम्यान, हिंदी-कन्नड भाषेचा वाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. लोक यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी याला भाषिक युद्ध म्हटले आहे, तर काहींनी महिलांमधील अशा भांडणावर आश्चर्य व्यक्त केले आहे. एका युजरने, "महिलांशी सामना करताना, सर्व कन्नड भाषा योद्धे त्यांच्या पायांमध्ये शेपटी घालून बसतात," असं म्हटलं. दुसऱ्या एका युजरने "भाषेचा व्हायरल महिलांमध्येही पसरला आहे," असं म्हटलं.
Web Summary : A heated argument broke out between two women at a Bangalore metro station over the use of Hindi versus Kannada. The dispute escalated, requiring intervention from bystanders. The video went viral, sparking debate online.
Web Summary : बेंगलुरु मेट्रो स्टेशन पर हिंदी बनाम कन्नड़ के उपयोग को लेकर दो महिलाओं के बीच तीखी बहस हुई। विवाद इतना बढ़ गया कि दर्शकों को हस्तक्षेप करना पड़ा। वीडियो वायरल हो गया, जिससे ऑनलाइन बहस छिड़ गई।