सावंतवाडीतील चोरीची दुचाकी गोव्यात सापडली
By Admin | Updated: December 23, 2014 00:04 IST2014-12-23T00:04:07+5:302014-12-23T00:04:07+5:30
डिचोली : सावंतवाडी येथून गोव्यात चोरून आणलेली मोटारसायकल जप्त करून संशयीत चोरास अटक करण्यात डिचोली पोलीसांनी यश मिळविले. संदेश संजू कुमार (२०) असे संशयीताचे नाव असून तो साखरवाडी निप्पानी येथील आहे.

सावंतवाडीतील चोरीची दुचाकी गोव्यात सापडली
ड चोली : सावंतवाडी येथून गोव्यात चोरून आणलेली मोटारसायकल जप्त करून संशयीत चोरास अटक करण्यात डिचोली पोलीसांनी यश मिळविले. संदेश संजू कुमार (२०) असे संशयीताचे नाव असून तो साखरवाडी निप्पानी येथील आहे. सावंतवाडी येथून त्याने दुचाकी चोरून तिचा क्रमांक बदलला होता व मोटारसायकल तो विकण्याच्या बेतात असताना डिचोली पोलीसांनी त्याला मोटारसायकलसह ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच. ०९ सीडी ४६४८ हा क्रमांक असलेली एक मोटारसायकल डिचोली बाजारात व परिसरात संशयितरित्या फिरत होती. तसेच च्या मोटारसायकल विक्री संदर्भात दुचाकीचालक बोलत असल्याने डिचोली पोलीसांनी संशयावरून त्याला ताब्यात घेतले व अधिक चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पुढील चौकशी केली असता सदर मोटारसायकलचा क्रमांक बनावट असून खरा क्रमांक एम.एच. ०७ व्हाय ४८४६ असल्याचे आढळून आले. यावरून हवालदार विभावरी गावस यांनी संदेश कुमार याला अटक केली. या शोधमोहिमेत हवालदार आत्माराम गावस, बाबाजी आजगावकर, निलेश फोगेरी, सखाराम गावकर यांनी अधिक कार्य करताना संशयाची सखोल माहिती मिळवून सावंतवाडी पोलिसांना माहिती दिली. सावंतवाडी पोलीसांनी दुचाकी व संशयीतास ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सपेंद्र शेटगावकर यांनी मार्गदर्शन केले.