अमेरिकेतील टॉलिवूड अभिनेत्रींच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, भारतीय जोडप्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 11:16 IST2018-06-16T11:16:35+5:302018-06-16T11:16:35+5:30

टॉलिवूड अभिनेत्रींना अमेरिकेत बोलवून त्यांना सेक्स रॅकेटमध्ये ढकलत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Two top Tollywood heroines trapped in sex trafficking | अमेरिकेतील टॉलिवूड अभिनेत्रींच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, भारतीय जोडप्याला अटक

अमेरिकेतील टॉलिवूड अभिनेत्रींच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, भारतीय जोडप्याला अटक

हैदराबाद- अमेरिकेमध्ये टॉलिवूड अभिनेत्रींचं सेक्स रॅकेट चालवत असल्या प्रकरणी अमेरिकन पोलिसांनी शिरागोमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या जोडप्याला अटक केली आहे. किशन मोदुगुमुडी उर्फ श्रीराज चोन्नूपत्ती (३४) आणि त्याची पत्नी चंद्रा (३१) असं अटक केलेल्या दोघांचं नाव हे हे जोडपं शोजच्या बहाण्याने टॉलिवूड अभिनेत्रींना अमेरिकेत बोलवून त्यांना सेक्स रॅकेटमध्ये ढकलत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिकागोच्या कोर्टात 42 पानी तक्रार दाखल झाल्यानंतर त्या आधारावर तपास करण्यात आल्याचं समोर आलं आहे. श्रीराज काही वर्षांपूर्वी टॉलिवूडमध्ये प्रोडक्श मॅनेजरचं काम करत होता. 

'११ मे २०१७ ते २२ जानेवारी २०१८ या कालावधीत या दाम्पत्यानं अनेक मुलींना देहविक्रीच्या व्यवसायात ढकललं असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पीडित मुलींना अमेरिकेत घेऊन जात होते. तेथे त्यांना हॉटेलात किंवा घरी 'कैद' करायचे. त्यानंतर अमेरिकेतील तेलुगू किंवा इतर भारतीय भाषिक सोहळ्यांमध्ये त्यांना देहविक्रीसाठी घेऊन जात होते,' असे तक्रारीत म्हटलं आहे. १६ फेब्रुवारी २०१८मध्ये पोलिसांनी या दाम्पत्याच्या घरी छापेमारी केली. तेथे एक बॅग सापडली. त्यात ७० कंडोम आणि एक नोंदवही मिळाली. त्यात अनेक अभिनेत्रींची नावं आणि त्यांच्या 'डेट्स'ची नोंद केली होती. शिकागो न्यायालयानं या दाम्पत्याचा जामीन अर्ज फेटाळून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे.

सिनेसृष्टीतील कास्टिंग काऊचवर आवाज उठविलणारी अभिनेक्षी श्री रेड्डी हिनेही या सेक्स रॅकेट संदर्भातील धक्कादायक खुलासा केला आहे. त्या जोडप्याने मलाही संपर्क केला होता. जेव्हा एखाद्या कलाकाराला ऑफर मिळत नाही तेव्हा ते युएसमध्ये जाऊन देहविक्रीच्या मार्गाला लागतात. कलाकाराला तिथे 1 हजार डॉलर इतकी किंमत मिळेत पण ते त्याच्या प्रसिद्धीवरही अवलंबूर असतं, असा खळबळजनक खुलासा श्री रेड्डीने केला आहे. 
 

Web Title: Two top Tollywood heroines trapped in sex trafficking