शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"देशातील दोन तृतीयांश लोक हिंदू राष्ट्राच्या बाजूने...", मणिशंकर अय्यर यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 18:24 IST

भारत एक असा देश आहे, जेथे सर्वांचेच खुल्या मनाने स्वागत होते. आपण एकमेकांशी एकोप्याने राहायला हवे, असेही मणिशंकर अय्यर म्हणाले...

सध्या संपूर्ण देशभरात हिंदू राष्ट्राची चर्चा सुरू आहे. यातच, कँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी यासंदर्भात आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सोमवारी मोठे विधान केले. द्वेषाचे राजकारण सुरू असतानाही देशातील दोन तृतियांश लोक हिंदू राष्ट्राच्या बाजूने नाहीत, असे अय्यर यांनी म्हटले आहे. 

एवढेच नाही, तर भारत एक असा देश आहे, जेथे सर्वांचेच खुल्या मनाने स्वागत होते. आपण एकमेकांशी एकोप्याने राहायला हवे, असेही मणिशंकर अय्यर म्हणाले. "देशात द्वेष पसरवला जातोय" -काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर म्हणाले, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आशियाई देश आणि दुबई, सौदी अरेबिया, ब्रिटन तसेच अमेरिकेसारख्या इतर देशांमध्ये राहणाऱ्या मुस्लिम बंधू आणि भगिनींना मी ईदीच्या शुभेच्छा देतो. मी अशा भारतातून बोलत आहे, जेथील भूमी सर्वांचे स्वागत करते. या देशात प्रत्येकाने आनंदाने राहावे, प्रत्येकाने एकमेकांसोबत शांततेने राहावे आणि आपण एकमेकांकडून खूप काही शिकायला हवे. यावर कसल्याही द्वेषाची गरज नाही, देशात द्वेष पसरवला जात आहे. मात्र, असे असूनही, दोन तृतीयांश भारतीयांनी, यात किमान ५० टक्के हिंदूंचा समावेश आहे, कधीही अशा राजकीय शक्तींना पाठिंबा दिला नाही, ज्यांना या देशाला हिंदू राष्ट्र बनवायची इच्छा आहे. हा एक सेक्युलर देश आहे आणि येथे सर्वजण सोबत राहतात.

"राजीव गांधी दोन वेळा नापास झाले, तरीही काँग्रेसनं त्यांना..." -काही दिवसांपूर्वी, राजीव गांधी यांच्या पात्रतेसंदर्भात मणिशंकर अय्यर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. "राजीव गांधी एक वैमानिक होते. मात्र ते दोन वेळा नापास झाले होते. केंब्रिज विद्यापीठात नापास होणे तसे कठीण आहे. कारण विद्यापीठ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करते. तरीही राजीव गांधी नापास झाले. त्यानंतर ते इंपिरियल कॉलेज लंडन येथे शिक्षणासाठी गेले. तिथेही ते अपयशी ठरले. अशा व्यक्तीला भारताचे पंतप्रधान कसे काय बनवले गेले," असा प्रश्न मणिशंकर अय्यर यांनी उपस्थित केला होता. 

टॅग्स :Mani Shankar Aiyarमणिशंकर अय्यरcongressकाँग्रेसHinduismहिंदुइझमMuslimमुस्लीम