काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 10:58 IST2019-07-27T10:57:27+5:302019-07-27T10:58:48+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

Two terrorists gunned down by security forces in Bunbazaar, Shopian | काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यातील बोनाबाजार येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक उडाली होती. दरम्यान ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. 

आज पहाटे  दक्षिण काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यातील बोनाबाजार येथे दोन ते दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या जवानांनी परिसराला घेराव घातला. हे दहशतवादी एका घरात लपून बसले होते. त्यांनी जवानांना पाहिल्यानंतर त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यानंतर जवानांनीही त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात दोन्ही दहशतवादी ठार झाले. 



या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरावर नजर ठेवली असून, दोन्हीकडून गोळीबार सुरू आहे. 

Web Title: Two terrorists gunned down by security forces in Bunbazaar, Shopian