शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

श्रीपाद नाईक यांच्यावर दोन शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 3:53 AM

श्रीपाद नाईक यांची प्रकृती आता स्थिर आहे. बांबोळीच्या गोमेकॉ रुग्णालयात डीन डॉ. बांदेकर यांच्या देखरेखीखाली नाईक यांच्या खांद्यावर व अन्यत्र अशा दोन शस्त्रक्रिया केल्या गेल्या

पणजी : केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर मंगळवारी पहाटे दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांचा मृतदेह गोव्यात आणला गेला आहे. गुरुवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. उत्तर गोव्याचे खासदार असलेल्या श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला उत्तर कर्नाटकातील अंकोला तालुक्यात सोमवारी रात्री आठ वाजता अपघात झाला. त्यांच्या वाहनाने रस्त्याच्या बाजूच्या एका झाडाला धडक दिली व त्याबरोबर गाडी उसळली व पडली.

श्रीपाद नाईक यांची प्रकृती आता स्थिर आहे. बांबोळीच्या गोमेकॉ रुग्णालयात डीन डॉ. बांदेकर यांच्या देखरेखीखाली नाईक यांच्या खांद्यावर व अन्यत्र अशा दोन शस्त्रक्रिया केल्या गेल्या. पहाटे तीन वाजता शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या. त्या यशस्वी झाल्या. त्यांच्या जीवितास धोका नाही.नाईक यांच्या पत्नीचे निधन झाले आहे हे नाईक यांना मंगळवारी सकाळपर्यंत तरी सांगितले गेले नाही. कारण श्रीपाद नाईक यांना तो धक्का ठरू शकतो. सापेर, रायबंदर येथे नाईक यांचे निवासस्थान आहे. तिथे त्यांचे पुत्र सिद्धेश नाईक, साईश व योगेश असतील.

राजनाथसिंह यांच्याकडून प्रकृतीविषयी विचारणा केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती आता स्थिर आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी या इस्पितळाला मंगळवारी भेट दिली व डॉक्टरांशी चर्चा करून नाईक यांच्या आरोग्याविषयी विचारणा केली. बुधवारी दिल्लीहून एम्सचे डॉक्टर्स गोव्यात येणार आहेत. ते नाईक यांची प्रकृती पाहतील व मग त्यांना उपचारांसाठी दिल्लीला नेण्याबाबत निर्णय होणार आहे. 

डॉ. घुमे यांचे निधनश्रीपाद नाईक यांच्यासोबत वाहनात एकूण सहा माणसे होती. डॉ. दीपक घुमे हेही वाहनात होते. घुमे हे लातूर येथील आहेत. त्यांचे निधन झाले. सहापैकी दोघांचे मृत्यू झाले. वाहनचालक जखमी झाला. श्रीपाद नाईक यांच्या स्वीय सहायकाचे निधन झालेले नाही.

टॅग्स :ministerमंत्रीAccidentअपघात