पेपरफुटी प्रकरणात आणखी दोन जणांची नावे
By Admin | Updated: December 10, 2015 23:57 IST2015-12-10T23:57:48+5:302015-12-10T23:57:48+5:30
जळगाव: जिल्हा परिषदेच्या परिचय पदाच्या पेपरफुटी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या शेख इसाक शेख लतिफ मिस्तरी (रा.उत्राण ता.एरंडोल) या विद्यार्थ्याकडून चौकशीत आणखी दोन जणांची नावे समोर आली आहेत. शेख इसाक याला मंगळवारी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तपासाधिकारी जगदीश देवरे यांनी त्याची चौकशी केली. त्यात आणखी दोनजणांची नावे पुढे आली आहे. त्यानुसार तपासाधिकारी देवरे यांनी त्या दोन जणांचा शोध घेतला मात्र, पोलीस येणार असल्याची कुणकुण लागल्याने ते दोघंजण फरार झाले, त्यामुळे पोलिसांना रिकाम्या हाताने परत यावे लागले. परीक्षा केंद्रावर बंदी असतानाही मोबाईल नेऊन त्यात आलेल्या संदेशावरून प्रश्नपत्रिका सोडविताना आढळून आल्याने शेख इसाक याच्यासह अन्य विद्यार्थ्यांवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला हा संदेश कोणी पाठविला, प्रश्नपत्रिकेतील

पेपरफुटी प्रकरणात आणखी दोन जणांची नावे
ज गाव: जिल्हा परिषदेच्या परिचय पदाच्या पेपरफुटी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या शेख इसाक शेख लतिफ मिस्तरी (रा.उत्राण ता.एरंडोल) या विद्यार्थ्याकडून चौकशीत आणखी दोन जणांची नावे समोर आली आहेत. शेख इसाक याला मंगळवारी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तपासाधिकारी जगदीश देवरे यांनी त्याची चौकशी केली. त्यात आणखी दोनजणांची नावे पुढे आली आहे. त्यानुसार तपासाधिकारी देवरे यांनी त्या दोन जणांचा शोध घेतला मात्र, पोलीस येणार असल्याची कुणकुण लागल्याने ते दोघंजण फरार झाले, त्यामुळे पोलिसांना रिकाम्या हाताने परत यावे लागले. परीक्षा केंद्रावर बंदी असतानाही मोबाईल नेऊन त्यात आलेल्या संदेशावरून प्रश्नपत्रिका सोडविताना आढळून आल्याने शेख इसाक याच्यासह अन्य विद्यार्थ्यांवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला हा संदेश कोणी पाठविला, प्रश्नपत्रिकेतील मजकूर कसा बाहेर आला, यात कोणाचा सहभाग आहे याची माहिती पोलीस शेखकडून घेत आहेत.