शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Birthday Special: राहुल गांधींच्या 'या' दोन प्रेमकहाण्या राहिल्या होत्या चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 12:46 PM

आज राहुल गांधींचा 48 वा वाढदिवस

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या पुढील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विरोधकांची एकजूट करुन भाजपाला सत्तेपासून दूर राखण्यासाठी राहुल गांधींचे प्रयत्न सुरू आहेत. आज राहुल गांधी 48 वर्षांचे झाले आहेत. राहुल यांनी 34 व्या वर्षी अमेठीमधून पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली. ही निवडणूक जिंकून राहुल विवाहबद्ध होतील आणि पुढील राजकारण करतील, अशी चर्चा त्यावेळी होती. मात्र अद्याप राहुल यांनी लग्न केलेलं नाही. मात्र प्रेम प्रकरणांमुळे ते दोनदा चांगलेच चर्चेत आले होते.'संडे गार्डियन'नं 2012 मध्ये राहुल गांधींचे अफगाणिस्तानचा राजा मोहम्मद जहिर शाहची नात नोएल जेहरसोबत प्रेमसंबंध असल्याचं वृत्त दिलं होतं. यानंतर राहुल आणि नोएल दिल्लीतील अमन हॉटेलमध्ये एकत्र दिसले होते. दिल्लीशिवाय फ्रान्समध्येदेखील हे दोघे सोबत दिसले होते. नोएलनं फ्रेंच युनिव्हर्सिटीमधून युरोपियन बिझनेस विषयात पदवी घेतली होती. ती मूळची इटलीची नागरिक होती. नोएलनं वेबस्टर युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून ज्वेलरी डिझाईनमध्ये स्पेशलायझेशनदेखील केलं होतं. नोएल धर्मांतर करुन रोमन कॅथलॅक झाल्याचं वृत्तदेखील त्यावेळी आलं होतं. राहुल गांधींची आई सोनिया गांधी यांच्या इटलीतील घरी नोएलनं पूजा केल्याची चर्चादेखील त्यावेळी होती. अफगाणिस्तानची राजकुमारी असलेल्या नोएलसोबत राहुल गांधी विवाह बंधनात अडकणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र 2013 मध्ये नोएलनं इजिप्तचा राजकुमार मोहम्मदसोबत विवाह केला. 1990 च्या दशकात केंब्रिज युनिव्हर्सिटीत राहुल गांधी यांची भेट वर्निक कार्टेलीशी झाली. मात्र याची माहिती लोकांना 1998 मध्ये समजली. त्यावेळी राहुल गांधी प्रचारासाठी दिल्लीला आले होते. यानंतर वर्षभरानंतर राहुल आणि वर्निक बर्मिंगहॅगमध्ये भारत आणि इंग्लंडच्या संघातील क्रिकेट सामना पाहताना दिसले. यानंतर वर्निक आणि राहुल यांच्यात प्रेमसंबंध असल्याची चर्चा सुरू झाली. त्याच वर्षी म्हणजेच 1999 मध्ये हे दोघे अंदमानमध्ये एकत्र सुट्टी एन्जॉय करताना दिसले. वर्निका मूळची कोलंबियाची असल्याची चर्चा त्यावेळी होती. यानंतर वर्निक राहुल यांच्या कुटुंबासह लक्षद्वीप आणि केरळमध्ये दिसली. त्यावेळी माध्यमांनी तिचं नाव जॉनिटा असल्याचं वृत्त दिलं होतं. 2004 मध्ये 'इंडियन एक्स्प्रेस'सोबत बोलताना राहुल गांधींनी याबद्दल पहिल्यांदा भाष्य केलं. 'माझी गर्लफ्रेंड आहे. पण ना तिचं नाव जोनिटा आहे, ना ती कोलंबियाची आहे,' असं राहुल यांनी म्हटलं होतं. 'तिचं नाव वर्निका असून ती मूळची स्पॅनिश आहे. ती आर्किटेक्ट असून माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे,' असं राहुल म्हणाले होते. आता हे दोघे संपर्कात आहेत का, याबद्दलची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी