जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; एकाला जीवंत पकडलं
By मोरेश्वर येरम | Updated: December 13, 2020 21:23 IST2020-12-13T21:21:22+5:302020-12-13T21:23:10+5:30
श्रीनगर जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेत भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर एका दहशतवाद्याला जिवंत ...

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; एकाला जीवंत पकडलं
श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेत भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आलं आहे.
सुरक्षा दलाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दहशतवाद्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती. पूंछच्या दुर्गन पोशणा भागात रविवारी दुपारपासून दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू होती. त्यानुसार कारवाई दरम्यान दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. तर एकाला अटक करण्यात आली आहे.
दहशतवाद्यांच्या एक गटाने गेल्या तीन दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमधून पूंछमध्ये घुसखोरी केली आहे आणि ते शोपियानच्या दिशेने निघाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. शुक्रवारपासून सुरक्षा दल या दहशतवाद्यांचा मागोवा घेत आहे.