शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

दोन लाख भाडे, तरीही हेलिकॉप्टरच हवे; हेलिकॉप्टरच्या मागणीत ४० टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 11:24 AM

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय नेते आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे देशभर दौरे सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय नेते आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे देशभर दौरे सुरू आहेत. त्यामुळे चार्टर्ड विमाने व हेलिकॉप्टरची मागणी ४० टक्क्यांनी वाढली असून, ही सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांना १५ ते २० टक्के अधिक उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. मागणीत वाढ झाल्यामुळे चार्टर्ड सेवांचे प्रतितास दरही वाढले आहेत. विमानासाठी आता ४.५ ते ५.२५ लाख रुपये, तर दोन इंजिनच्या हेलिकॉप्टरसाठी १.५ ते १.७ लाख रुपये आकारले जात आहेत, असे या व्यवसायाशी संबंधित सूत्रांनी सांगितले. सामान्य काळ, तसेच मागील निवडणुकांच्या तुलनेमध्ये यावेळी चार्टर्ड विमान व हेलिकॉप्टरची मागणी वाढली आहे.  विमाने व हेलिकॉप्टर पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाली आहे. काही सेवा पुरवठादार ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी दुसऱ्या कंपन्यांकडून चालक दलासह विमान व हेलिकॉप्टर किरायाने घेऊ इच्छित आहेत. राजकीय पक्ष आपले उमेदवार आणि नेत्यांना विविध ठिकाणी, विशेष करून दुर्गम भागात कमी वेळेत पोहोचता यावे म्हणून हेलिकॉप्टरचा उपयोग करतात.

यूपीसारख्या मोठ्या राज्यांत हेलिकॉप्टरचा अधिक उपयोग‘हेलिकॉप्टरची मागणी वाढत असून, ती सामान्य काळाच्या तुलनेत निवडणूक काळात २५ टक्क्यांनी अधिक आहे. तथापि, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी  आहे, असे रोटरी विंग सोसायटी ऑफ इंडियाचे (आरडब्ल्यूएसआय) अध्यक्ष (पश्चिम क्षेत्र) कॅप्टन उदय गेली यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. सामान्यपणे राजकीय पक्ष आपले उमेदवार आणि नेत्यांना विविध ठिकाणी, विशेष करून दुर्गम भागात कमी वेळेत पोहोचता यावे म्हणून हेलिकॉप्टरचा उपयोग करतात. उत्तर प्रदेश (यूपी), पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांत हेलिकॉप्टरचा उपयोग अधिक होताना दिसत आहे, असे गेली म्हणाले. चार्टर्ड विमानांची मागणी मागील सार्वत्रिक निवडणुकांच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांनी अधिक आहे, असे बिझनेस एअरक्रॉफ्ट ऑपरेटर्स असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन आर. के. बाली यांनी सांगितले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश