दोन वर्षांत दोन लाख सरकारी नोकऱ्या

By Admin | Updated: April 26, 2016 05:32 IST2016-04-26T05:32:18+5:302016-04-26T05:32:18+5:30

सरकारी नोकऱ्यांचा शोध घेत असलेल्या बेरोजगारांसाठी मोठ्या संधी चालून आल्या आहेत. केंद्र सरकार आपल्या विविध विभागांत दोन लाखांहून अधिक पदनिर्मिती केली जाण्याची शक्यता आहे.

Two lakh government jobs in two years | दोन वर्षांत दोन लाख सरकारी नोकऱ्या

दोन वर्षांत दोन लाख सरकारी नोकऱ्या

नवी दिल्ली : सरकारी नोकऱ्यांचा शोध घेत असलेल्या बेरोजगारांसाठी मोठ्या संधी चालून आल्या आहेत. केंद्र सरकार आपल्या विविध विभागांत दोन लाखांहून अधिक पदनिर्मिती केली जाण्याची शक्यता आहे.
२०१६-१७ च्या अर्थसंकल्पानुसार २०१७ पर्यंत कर्मचाऱ्यांच्या संख्येत २.१८ लाखांची वाढ करण्याचा संकल्प सरकारने केला आहे. गृहमंत्रालय ५६३५ नव्या पदांसह आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून २२००६ करणार आहे. पोलीस विभागात ४७,२६४ नवी पदे निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण कर्मचाऱ्यांची संख्या वाढून १०,७५,३४१ एवढी होईल. ही संख्या २०१५ मध्ये १०,२८,०७७ एवढी होती.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार संरक्षण मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची संख्या २०१७ पर्यंत १०,८९४ ने वाढवून ५१,०८४ करण्यात येणार आहे. निवृत्तीवेतन विभागाचे राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, दूरदृष्टीने सरकार या प्रस्तावांवर विचार करीत आहे. ज्या ठिकाणी गरज असेल तेथे नव्या पदांची निर्मिती करण्याबाबत सरकार विचार करील. शासनप्रणाली अधिक मजबूत होण्यास यातून मदत मिळेल, असेही ते म्हणाले.

Web Title: Two lakh government jobs in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.