Jammu And Kashmir : नौशेरा सेक्टरमध्ये चकमक, दोन जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 10:54 IST2020-01-01T09:57:15+5:302020-01-01T10:54:18+5:30
जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे.

Jammu And Kashmir : नौशेरा सेक्टरमध्ये चकमक, दोन जवान शहीद
नौशेरा - जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. बुधवारी (1 जानेवारी) या चकमकीदरम्यान दोन जवान शहीद झाले आहेत. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू होती. त्याच दरम्यान दोन जवान शहीद झाले आहेत.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये नौशेरा सेक्टरमध्ये चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी दोन जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
Two Indian Army soldiers have lost their lives during a cordon & search operation in Nowshera sector(J&K). The operation is still in progress. Further details awaited. pic.twitter.com/yIk6GMdZzD
— ANI (@ANI) January 1, 2020
काही दिवसांपूर्वी शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी अतिशय आक्रमकपणे उत्तर दिल्याने पाकचे सहा जवानांना ठार झाले होते. काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारताच्या हद्दीतील गावांमध्ये पाकिस्तानी लष्करातर्फे वारंवार गोळीबार व तोफांचा मारा सुरू असल्याने भारतीय जवानांनीही त्यांना तसेच उत्तर दिले. पाकिस्तानी सैनिकांनी पूंछ जिल्ह्यातील राजोरी सेक्टरमध्ये गोळीबार केला आीणि तोफांचाही मारा केला होता. त्यात भारताच्या एका जवानाला वीरमरण आले होते.
गेल्या काही वर्षांपासून काश्मीरमधील दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागले असून, सरत्या वर्षामध्ये काश्मीर खोऱ्यात सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. तसेच दहशतवादी संघटनांमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या दहशतवाद्यांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. यासंदर्भातील माहिती जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिली आहे.
सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचे उच्चाटन करण्यात येत असलेल्या यशाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, ''काश्मीर खोऱ्यामध्ये दीर्घकाळापासून सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. काश्मीरमधील सक्रिय दहशतवाद्यांचा आकडा 300 वरून 250 पर्यंत खाली आला आहे.''
''आमच्याकडे असलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 130 घुसखोर घुसखोरी करण्यात यशस्वी झाले. गतवर्षी घुसखोरीच्या सुमारे 143 घटना समोर आल्या होत्या. त्याबरोबरच दहशतवादी संघटनांमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या तरुणांच्या संख्येतही लक्षणीय अशी घट झाली आहे. गतवर्षी सुमारे 218 तरुणांनी दहशतवादाची वाट धरली होती. मात्र यावर्षी हा आकडा घटून 139 वर आला आहे,''अशी माहितीही दिलबाग सिंह यांनी दिली.