वेश्याव्यवसायातून दोन तरुणींची सुटका

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:32+5:302015-02-14T23:51:32+5:30

पुणे : नोकरीच्या आमिषाने फसवून वेश्याव्यवसायासाठी पुण्यात आणलेल्या दोन तरुणींची गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने (एएचटीयु) शनिवारी दुपारी चारच्या सुमारास सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या तरुणींमध्ये बांग्लादेशाच्या एका तरुणीचा समावेश असून याप्रकरणी मुंबईच्या एका दलाला अटक करण्यात आली आहे.

Two girls get rid of prostitution | वेश्याव्यवसायातून दोन तरुणींची सुटका

वेश्याव्यवसायातून दोन तरुणींची सुटका

णे : नोकरीच्या आमिषाने फसवून वेश्याव्यवसायासाठी पुण्यात आणलेल्या दोन तरुणींची गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने (एएचटीयु) शनिवारी दुपारी चारच्या सुमारास सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या तरुणींमध्ये बांग्लादेशाच्या एका तरुणीचा समावेश असून याप्रकरणी मुंबईच्या एका दलाला अटक करण्यात आली आहे.
सुहाग मन्सुरअली शेख (वय २७, रा. कळवा वेस्ट, ठाणे) असे त्याचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार पथकाचे गणेश जगताप यांना शेखच्या बाबतीत खब-यामार्फत माहिती मिळाली होती. शेख हा मुंबईहून वेश्याव्यवसायासाठी मुली घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्याबरोबर वरिष्ठ निरीक्षक निकम यांच्यासह सहायक निरीक्षक ज्योती राजेशिर्के, गणेश जगताप, शशिकांत शिंदे, संजय गिरमे, सुरेश विधाते, नितीन तेलंगे, राजेश उंबरे, सचिन कोकरे यांनी शिवाजीनगर येथील राहूल टॉकीजसमोर सापळा लावला. दोन तरुणींसह तेथे आलेल्या शेखला पोलिसांनी पकडले.
सुटका करण्यात आलेल्या तरुणींपैकी एक बांग्लादेशची असून दुसरी पश्चिम बंगालची आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी युगांडा देशाच्या तीन तरुणींची सुटका केल्यानंतर सलग दुस-या दिवशी पथकाने कारवाई केली आहे. अतिरीक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. शहाजी सोळुंके, उपायुक्त जयंत नाईकनवरे, सहायक पोलीस आयुक्त प्रसाद हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

Web Title: Two girls get rid of prostitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.