'त्या' वादग्रस्त बस स्टॉपवरील दोन घुमट हटवले, भाजपम खासदाराने दिली होती पाडण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 15:45 IST2022-11-27T15:45:46+5:302022-11-27T15:45:56+5:30
बस स्टॉपवर मशिदीप्रमाणे घुमट बांधण्यात आले होते, त्याला भाजप खासदाराने कडाडून विरोध केला होता.

'त्या' वादग्रस्त बस स्टॉपवरील दोन घुमट हटवले, भाजपम खासदाराने दिली होती पाडण्याची धमकी
Karnataka Bus Stop: काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील म्हैसूर येथील बसस्थानकाचे फोटोज इंटरनेटवर व्हायरल झाले होते. बस स्टॉपवर तीन घुमट बांधण्यात आले होते. हे घुमट एखाद्या 'मशिदीसारखे' दिसत होते. या बांधकामाचा अनेकांनी विरोध केला होता. भाजप खासदाराने तर हे बसस्थानक पाडण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता बसस्थानकाला नवीन रूप देण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रीय महामार्ग-766 च्या केरळ बॉर्डर-कोलेगला सेक्शनवर असलेल्या बस स्टॉपवर आता फक्त एकच घुमट ठेवण्यात आला आहे. या घुमटाला लाल रंगही देण्यात आला आहे. तीनपैकी दोन घुमट काढण्यात आले आहेत. भाजप खासदार प्रताप सिम्हा यांनी हे बसस्थानक पाडण्याची धमकी दिली होती. त्यामुळे हे घुमट काढण्यात आले.
ಮಧ್ಯದಲ್ಲೊಂದು ದೊಡ್ಡ ಗುಂಬಜ್, ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಎರಡು ಚಿಕ್ಕ ಗುಂಬಜ್ ಇದ್ದರೆ ಅದು ಮಸೀದೀನೇ, ಅದನ್ನು ತೆರವು ಮಾಡಿಸುತ್ತೇನೆ ಎಂದಿದ್ದೆ ಮತ್ತು ಅದರಂತೆ ನಡೆದುಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. ಕಾಲಾವಕಾಶ ಕೇಳಿ ಮಾತಿನಂತೆ ನಡೆದುಕೊಂಡ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹಾಗು ವಾಸ್ತವ ಅರಿತು ಜನಾಭಿಪ್ರಾಯಕ್ಕೆ ತಲೆಬಾಗಿದ ರಾಮದಾಸ್ ಜಿ ಅವರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. pic.twitter.com/9b1wPLULJ4
— Pratap Simha (@mepratap) November 27, 2022
जेसीबीने पाडण्याचा इशारा दिला होता
खासदार प्रताप सिम्हा यांनी जेसीबीने बसस्थानक पाडण्याचा इशारा दिला होता. तसेच, म्हैसूरच्या बहुतांश भागात अशा 'घुमटय़ासारख्या' वास्तू बांधल्या जात असल्याचा दावाही त्यांनी केला. भाजप खासदाराचे हे वक्तव्य फुटीर असल्याची टीका विरोधकांसह अनेकांनी केली. विशेष म्हणजे, स्थानिक भाजप आमदार राम दास यांनीच हे बस स्टॉप बांधले आहे.
आमदारानेच दोन घुमट काढले
भाजप आमदाराने सुरुवातीला आपल्या सहकारी खासदाराच्या इशाऱ्याला कानाडोळा केला होता. पण, नंतर स्थानिकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी माफी मागितली आणि दोन घुमट काढणार असल्याचे सांगितले. यानंतर रविवारी (27 नोव्हेंबर) सकाळी भाजप खासदार प्रताप सिम्हा यांनी बस स्टॉपमध्ये केलेल्या बदलांची बातमी शेअर केली आणि भाजप आमदारासह जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.