जोड़़़़ समितीकडे दोन तक्रारी

By Admin | Updated: December 24, 2014 01:01 IST2014-12-22T23:11:49+5:302014-12-24T01:01:39+5:30

औसा तालुक्यातील किनीथोट येथे दोघांचा वैद्यकीय व्यवसाय अनाधिकृत (बोगस) असल्याच्या तक्रारी नुकत्याच प्राप्त झाल्या आहेत़ समितीकडून त्या दोघा व्यवसायीकांची तपासणी होणार असून, त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायाचे कागदपत्र बोगस आढळल्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे़ दरम्यान समितीमार्फत त्याची पडताळणीही होत आहे़

Two complaints to Joint Committee | जोड़़़़ समितीकडे दोन तक्रारी

जोड़़़़ समितीकडे दोन तक्रारी

औसा तालुक्यातील किनीथोट येथे दोघांचा वैद्यकीय व्यवसाय अनाधिकृत (बोगस) असल्याच्या तक्रारी नुकत्याच प्राप्त झाल्या आहेत़ समितीकडून त्या दोघा व्यवसायीकांची तपासणी होणार असून, त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायाचे कागदपत्र बोगस आढळल्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे़ दरम्यान समितीमार्फत त्याची पडताळणीही होत आहे़
तालुकास्तरीय समितीचा नकाऱ़़
तालुकास्तरीय समिती बोगस डॉक्टरांचा शोध घेईल परंतु गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवू नये, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे तालुकास्तरीय समितीने केली आहे़ स्थानिक पातळीवर त्या संबंधीत बोगस डॉक्टरांकडून त्रास होऊ शकतो़ त्यामुळे गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय समितीवर सोपवावी, असे तालुकास्तरीय समितीचे म्हणणे आहे़ २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत ही मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे़ त्यामुळे आता व्यक्ती ऐवजी समिती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहे़
गुन्हे दाखल झालेले काही बोगस डॉक्टर आजही करतात व्यवसाय़़़
२०१२-१३ मध्ये ज्या ५४ डॉक्टरांवर बोगस डॉक्टर म्हणून गुन्हा दाखल झाला आहे़ त्यातील अनेकजण पुन्हा व्यवसाय करत आहेत़ आपल्या मुळ पॅथीची पाटी लाऊन ॲलोपॅथीचा व्यवसाय सुरु आहे़ लातूर तालुक्यातील तांदुळजा येथील अशा दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला होता़ हे दोन्ही प्रकरणे न्यायप्रविष्ठ असतानाही त्यांनी पुन्हा व्यवसाय थाटला आहे़ शोध समितीकडे याबाबत कधी कार्यवाही करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे़

Web Title: Two complaints to Joint Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.