नोएडा - दिवाळीत सगळीकडे फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे. त्यात २० वर्षीय शिवा नावाच्या युवकाचा जीव गेला आहे. या युवकाच्या मृत्यूमुळे नोएडाच्या छीजरसी कॉलनीत शोककळा पसरली आहे. शिवाने स्टीलच्या ग्लासमध्ये फटाका ठेवून वात लावली. त्यानंतर जोरदार स्फोट झाला.
या स्फोटात स्टीलच्या ग्लासचे तुकडे शिवाच्या शरीरात घुसले, ज्यात तो गंभीर जखमी झाला. घटनास्थळी असलेल्या लोकांनी शिवाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र शिवाची परिस्थिती नाजूक होती. मंगळवारी उपचारावेळी शिवाने प्राण सोडले. शिवाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला.
दरम्यान, पोलिसांनी शिवाचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे. सध्या पुढील कार्यवाही सुरू आहे. युवकांनी अशाप्रकारे जीवघेणे प्रयोग करू नयेत. सुरक्षितपणे उत्सव साजरा करा, फटाके फोडताना जीवाची काळजी घ्या असं आवाहन पोलिसांनी केले आहे.
हैदराबादमध्ये फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या, ज्यात ४७ हून अधिक रुग्णालयात दाखल झाले आहेत. यातील २० मुलांच्या डोळे आणि हातांना गंभीर इजा झाल्या आहेत. लवंगी फटाक्यामुळे झालेल्या दुर्घटनेत काहींच्या डोळ्यात रसायन शिरल्याचं सांगितले जाते.
Web Summary : A 20-year-old died in Noida after a firecracker exploded inside a steel glass. The blast caused severe injuries, leading to his death in hospital. Police are investigating and urging caution during Diwali celebrations. Hyderabad also reported numerous firecracker-related injuries, including serious eye damage.
Web Summary : नोएडा में स्टील के गिलास में पटाखा फटने से 20 वर्षीय युवक की मौत हो गई। विस्फोट से गंभीर चोटें आईं, जिससे अस्पताल में उसकी जान चली गई। पुलिस जांच कर रही है और दिवाली समारोह के दौरान सावधानी बरतने का आग्रह कर रही है। हैदराबाद में भी पटाखे से संबंधित कई चोटें आई हैं।