टीव्ही अभिनेत्याने केली आत्महत्या, गेल्या वर्षीच झालं होतं लग्न

By admin | Published: May 3, 2017 10:18 PM2017-05-03T22:18:19+5:302017-05-03T22:18:19+5:30

गेल्या वर्षीच दोघांचा विवाह झाला होता. आत्महत्या का केली याचं नेमकं कारण समजू शकलं नसलं तरी आर्थिक चणचणीमुळे...

TV Actor committed suicide, last year, marriage was done | टीव्ही अभिनेत्याने केली आत्महत्या, गेल्या वर्षीच झालं होतं लग्न

टीव्ही अभिनेत्याने केली आत्महत्या, गेल्या वर्षीच झालं होतं लग्न

Next
>
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 3 - दाक्षिणात्य टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता प्रदीप कुमार याने आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे.  बुधवारी सकाळी 4 वाजता हैदराबादमधील आपल्या राहत्या घरात त्याने फाशी घेऊन आत्महत्या केली. तेलुगू टीव्ही शो "सप्था मात्रिका"मधून प्रदिपने आपली ओळख निर्माण केली होती.
 
प्रदिपने आत्महत्या केली त्यावेळी त्याची पत्नी पावनी रेड्डी घरी नव्हती असं वृत्त आहे. गेल्या वर्षीच दोघांचा विवाह झाला होता. प्रदिपने आत्महत्या का केली याचं नेमकं कारण समजू शकलं नसलं तरी आर्थिक चणचणीमुळे त्याने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. 
पोलीस या प्रकरणी तपास करत अशून प्रदिपच्या कुटुंबांचीही चौकशी केली जात आहे.  
 
प्रदीप आणि पावनी रेड्डी तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक होते. प्रदिपच्या मृत्यूमुळे येथील इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.  प्रदीपने "अग्निपुलु", "आरूगुर प्रतिव्रतालु" सारख्या कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे, मात्र "सप्था मात्रिका" या शोमुळे त्याला खरी ओळख मिळाली होती.  
 

Web Title: TV Actor committed suicide, last year, marriage was done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.