शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मोफत गॅस वगैरे सगळा दिखावा; 'हे' आहे उज्ज्वला योजनेच्या विस्तवामागचं वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 13:29 IST

'उज्ज्वला' योजनेचं धक्कादायक वास्तव

नवी दिल्ली: उज्ज्वला योजनेमुळे देशातील गरीब महिलांच्या आयुष्यात परिवर्तन घडल्याचं मोदी सरकारकडून सांगितलं जात आहे. मोदींनी अनेक सभांमधून या योजनेचा उल्लेख करत स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे. मात्र या योजनेचं सत्य काही वेगळंच आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना मोफत गॅस जोडणी (शेगडी आणि सिलेंडर) दिल्याचं मोदी सांगतात. मात्र या योजनेतून महिलांना ना सिलेंडर मोफत मिळतो, ना शेगडी.उज्ज्वला योजनेच्या कोणत्याही लाभार्थ्याला गॅस जोडणी घेताना 1750 रुपये द्यावे लागतात. यातील 990 रुपये शेगडीसाठी, तर 760 रुपये सिलेंडरसाठी घेतले जातात. गॅस जोडणी घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 1600 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, असा सरकारचा दावा आहे. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. या योजनेतील पहिल्या सहा सिलेंडरवर मिळणारं अनुदान सरकार स्वत:कडे ठेवतं. आर्थिक मदत म्हणून दिली जाणारी रक्कम वसूल करण्यासाठी सरकारकडून ही रक्कम वापरली जाते. सरकारकडून फक्त गरीब महिलांना फक्त 150 रुपयांचा रेग्युलेटर मोफत दिला जातो. सरकारकडून दिला जाणारा गॅस जोडणीचा पाईपदेखील अतिशय लहान आहे. उज्ज्वला योजनेतून गॅस जोडणी घेणाऱ्या महिलांना पहिले सहा सिलेंडर बाजारभावानं खरेदी करावे लागतात. या सिलेंडरसाठी महिलांना 750 ते 900 रुपये मोजावे लागतात. एका सिलेंडरवर साधारणत: 240 ते 290 रुपयांचं अनुदान असतं. मात्र पहिले सहा सिलेंडर बाजारभावानं खरेदी करायला लावून सरकार गरीब महिलांकडून 1740 रुपये वसूल करतं.यामुळेच उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत गॅस जोडणी घेणाऱ्या महिला दुसऱ्यांदा सिलेंडर खरेदी करत नाहीत. जवळपास 50 टक्के ग्राहक दर दोन महिनांनी गॅस सिलेंडर खरेदी करतात. तर 30 टक्के महिला तीन-चार महिन्यांनंतर गॅस सिलेंडर घेतात. ही संपूर्ण आकडेवारी मार्च 2018 पर्यंतची आहे. सरकारची ही योजना फसल्यानं एप्रिल 2018 मध्ये उज्ज्वला योजनेतील सिलेंडरवर अनुदान देण्याचा निर्णय घेतला.  

टॅग्स :Pradhan Mantri Ujjwala Yojanaप्रधान मंत्री उज्ज्वला योजना - विकिपीडियाBJPभाजपाIndiaभारत