ट्रम्प दाम्पत्य घेणार ढोकळ्याचा आस्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 01:59 IST2020-02-24T01:59:02+5:302020-02-24T01:59:13+5:30

शेफ सुरेश खन्ना सगळे पदार्थ बनवणार

Trump wants to get married | ट्रम्प दाम्पत्य घेणार ढोकळ्याचा आस्वाद

ट्रम्प दाम्पत्य घेणार ढोकळ्याचा आस्वाद

अहमदाबाद : डोनाल्ड ट्रम्प दाम्पत्य साबरमती आश्रमाला भेट देईल तेव्हा त्यांचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत खमण ढोकळा, गुजरातचा प्रसिद्ध आल्याचा चहा, कोबी आणि मक्याचा समोसा, अनेक धान्यांपासून बनवलेली बिस्किटे, आईस टी (चहा) व ग्रीन टी देऊन केले जाईल. शेफ सुरेश खन्ना हे सगळे पदार्थ बनवणार आहेत. हे सगळे पदार्थ पूर्णपणे शाकाहारी असून ते गुजराती पद्धतीने बनवले जातील. आधी अन्न निरीक्षक या पदार्थांची चव घेऊन मगच ते पाहुण्यांना दिले जातील. दिल्लीत ट्रम्प यांचा मुक्काम ज्या हॉटेलात असणार आहे तेथील शेफला पाहुण्यांची आवड-निवड आधीच कळविण्यात आली आहे.

Web Title: Trump wants to get married