भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर ट्रकचालक फरार : राष्ट्रीय महामार्गावरील अपघात

By admin | Published: February 23, 2016 12:03 AM2016-02-23T00:03:35+5:302016-02-23T00:03:35+5:30

जळगाव : भरधाव वेगात जाणार्‍या ट्रकने दुचाकीस्वारास धडक दिल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ ते १० वाजेदरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल जान्हवीसमोर घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

Truck driver jumped by two-wheeler in a truck crash: Accident on National Highway | भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर ट्रकचालक फरार : राष्ट्रीय महामार्गावरील अपघात

भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर ट्रकचालक फरार : राष्ट्रीय महामार्गावरील अपघात

Next
गाव : भरधाव वेगात जाणार्‍या ट्रकने दुचाकीस्वारास धडक दिल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ ते १० वाजेदरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल जान्हवीसमोर घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल अलंकारी (वय २८, रा.जळगाव) असे अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. विशाल त्याच्याकडे असणार्‍या (एमएच १९ सी ६७९) क्रमांकाच्या दुचाकीने जात होता. त्याच वेळी भुसावळकडून शहराच्या दिशेने भरधाव वेगात येणार्‍या (एमएच १९, ४४७८) क्रमांकाच्या ट्रकने त्याच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात विशालच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. नागरिकांच्या मदतीने त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला त्वरित खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळी ट्रक सोडून फरार झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त दुचाकी व ट्रक पोलीस ठाण्यात आणण्यात आला. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

Web Title: Truck driver jumped by two-wheeler in a truck crash: Accident on National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.