शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला ट्रकची धडक, 24 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 09:36 IST

जखमींना जिल्हा रुग्णालयात आणि सैफई पीजीआय येथे पाठविण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन घटनास्थळी उपस्थित पोहोचले आहे.

लखनऊः उत्तर प्रदेशमधील औरैया जिल्ह्यात एका ट्रकने प्रवासी मजुरांनी भरलेल्या डीसीएमला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 24 मजूर ठार झाले आहेत. तसेच 15 लोक जखमी आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात आणि सैफई पीजीआय येथे पाठविण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एका ट्रकने कामगारांना घेऊन जाणा-या डीसीएमला धडक दिली, अपघातात 24 लोक ठार, तर 15 जण जखमी झाले. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ट्रकने धडक दिली, तेव्हा डीसीएम रस्त्यावर उभा होता. औरैया, एसपी सुनिती सिंह आणि अनेक पोलीस ठाण्यांचे पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत. पोलीस मदत व बचावकार्यात व्यस्त आहेत. गंभीर जखमी झालेल्यांना कानपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे. घटनेचा विचार करता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच प्रशासकीय कर्मचारीही जागरूक झाले आहेत. तातडीने पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य आणि मदतकार्य सुरू केले. या अपघातात 24 जणांचा मृत्यू झाल्याचे ओरैया सीएमओ अर्चना श्रीवास्तव यांनी सांगितले. 22 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, गंभीर जखमींपैकी 15 जणांना सेफाई पीजीआय येथे दाखल करण्यात आले आहे. ते सर्व मजूर राजस्थानहून बिहार-झारखंडला जात होते. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनकया घटनेनंतर समोर आलेल्या चित्रात मजुरांच्या मालाचा ढीगदेखील पाहायला मिळतो आहे. एसपी औरैया यांच्याशी घटनेविषयी सांगितले की, ही घटना पहाटे 3 ते 4 दरम्यान घडल्याचे घडली. बचावकार्य सध्या सुरू आहे. जखमींपैकी काही जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, ज्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना सैफईसाठी हलवण्यात आलं आहे. या घटनेनंतर डीएम औरैया अभिषेक सिंह यांनी म्हटले आहे की, यातील बहुतेक लोक बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील होते.सीएम योगी यांनी घटनेची घेतली दखलमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी औरैया येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची दखल घेतली आहे. या अपघातात प्राण गमावलेल्या कामगारांबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश कुमार अवस्थी यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री योगी यांनी पीडितांना सर्वतोपरी दिलासा देण्याचे तसेच सर्व जखमींना योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी मंडलयुक्त कानपूर आणि आयजी कानपूर यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या देखरेखीखाली मदतकार्य करण्याचे, अपघाताचे कारण तपासून माहिती देण्याची सूचना केली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघात