निवडणुकीत पैसे वाटल्याप्रकरणी खासदाराला तुरुंगवासाची शिक्षा, देशातील पहिलीच घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 13:15 IST2021-07-25T13:14:08+5:302021-07-25T13:15:51+5:30
MP maloth kavitha jailed : तेलंगाणा राष्ट्र समितीच्या खासदार मलोत कविता यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पैसे वाटल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.

निवडणुकीत पैसे वाटल्याप्रकरणी खासदाराला तुरुंगवासाची शिक्षा, देशातील पहिलीच घटना
हैदराबाद: निवडणुकीदरम्यान नेत्यांवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप अनेकदा होत असतो. पण, पैसे वाटल्याप्रकरणी खासदारला शिक्षा झाल्याचे पहिलेच प्रकरण हैदराबादमध्ये घडले आहे. मतदारांना पैसे दिल्याप्रकरणी तेलंगाणातील महबूबाबादच्या आणि तेलंगाणा राष्ट्रीय समिती (TRS) च्या खासदार मलोत कविता (Maloth Kavitha) यांना नामपल्लीमधील एका विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
मलोत कविता यांना 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान पैसे दिल्याच्या प्रकरणता दोषी ठरवले आहे. कोर्टाने त्यांना दहा हजार रुपये दंढ आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पण, त्यांना हायकोर्टात अपील करण्यासाठी परवानगी असेल. आता लवकरच मलोत कविता हाय कोर्टात अपील करू शकतात.
असा झाला खुलासा
ही घटना तेव्हा समोर आली, जेव्हा 2019 मध्ये महसुल अधिकाऱ्यांनी मलोत कविता यांचा सहकारी शौकत अलीला पैसे वाटताना रंगेहात पकडले होते. शौकत अली बर्गमपहाड परिसरातील मतदारांना एका मतासाठी 500 रुपये देत होते. यानंतर पोलिसांनी आधी शौकत अलीवर आणि त्यानंतर मलोत कविता यांच्यावर मतदारांना पैसे दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
कोर्टात पुरावे सादर
पोलिसांनी सुनावणीदरम्यान फ्लाइंग स्काव्डच्या अधिकारी आणि त्यांच्या रिपोर्टला पुरावा म्हणून सादर केले. चौकशीदरम्यान शौकत अलीने आरोप मान्य करत कविता यांच्या सांगण्यावरुन पैसे वाटल्याचे कबुल केले.