TRSनेत्याचा अजब जल्लोष; स्थानिकांना वाटल्या दारुच्या बाटल्या आणि जिवंत कोंबड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 19:31 IST2022-10-04T19:29:02+5:302022-10-04T19:31:49+5:30

तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष केसीआर उद्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करू शकतात.

TRS leader Rajanala Srihari distributes liquor bottles and chicken to locals ahead of Telangana CM KC Rao launching a national party | TRSनेत्याचा अजब जल्लोष; स्थानिकांना वाटल्या दारुच्या बाटल्या आणि जिवंत कोंबड्या

TRSनेत्याचा अजब जल्लोष; स्थानिकांना वाटल्या दारुच्या बाटल्या आणि जिवंत कोंबड्या

वारंगल: राजकीय पक्षांकडून आणि नेत्यांकडून नागरिकांना अनेक प्रकारची प्रलोभन दिली जातात. मतदारांना खुश करण्यासाठी नेते मोफत जेवण, कपडे, साड्या किंवा इतर विविध वस्तू वाटतात. काही नेते लोकांना पैसेही वाटल्याचे आपण ऐकले आहे. पण, एका नेत्याने चक्क दारुच्या बाटल्या आणि जिवंत कोंबडी वाटली आहे.

तेलंगणाच्या वारंगलमधील TRS नेते राजनाला श्रीहरी यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ते स्थानिकांना दारू आणि जिवंत कोंबडी मोफत वाटताना दिसत आहे. दारू-चिकन घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे यात दिसत आहे. केसीआर यांची 5 ऑक्टोबरला सभा होणार आहे. यापूर्वी राजनालाकडून स्थानिकांना दारू आणि चिकनचे वाटप सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

राष्ट्रीय पक्षाची घोषणा?
तेलंगणा राष्ट्र समितीची सर्वसाधारण सभा दसऱ्याला 5 ऑक्टोबर रोजी तेलंगणा भवनात होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत तेलंगणा राष्ट्र समितीला राष्ट्रीय पक्ष घोषित केले जाऊ शकते. या बैठकीचा अजेंडा देण्यात आलेला नाही, मात्र टीआरएस अध्यक्ष केसीआर राव राष्ट्रीय राजकारणात सक्रियतेसाठी आपली योजना जाहीर करू शकतात, असे मानले जात आहे. 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता तेलंगणा भवन येथे पक्षाची सर्वसाधारण सभा होणार आहे.

Web Title: TRS leader Rajanala Srihari distributes liquor bottles and chicken to locals ahead of Telangana CM KC Rao launching a national party