मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का द्यावा लागला? बिप्लब देब यांनी सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 18:35 IST2022-05-14T18:33:40+5:302022-05-14T18:35:58+5:30

biplab kumar deb : भाजपने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली असून लवकरच राज्यात नव्या मुख्यमंत्र्याची निवड होऊ शकते. राजीनामा दिल्यानंतर बिप्लब देब म्हणाले की, आपण संघटनेच्या हितासाठी राजीनामा दिला आहे.

tripura chief minister biplab kumar deb first reaction after resignation party prepare for 2023 election | मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का द्यावा लागला? बिप्लब देब यांनी सांगितलं...

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का द्यावा लागला? बिप्लब देब यांनी सांगितलं...

नवी दिल्ली : त्रिपुरात मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी बिप्लब देब यांनी राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. भाजपने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली असून लवकरच राज्यात नव्या मुख्यमंत्र्याची निवड होऊ शकते. राजीनामा दिल्यानंतर बिप्लब देब म्हणाले की, आपण संघटनेच्या हितासाठी राजीनामा दिला आहे.

राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर बिप्लब देब यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी 2023 नंतरही आम्हाला त्रिपुरामध्ये दीर्घकाळ सरकार हवे आहे. त्यासाठी पक्षाकडून तयारी सुरू आहे. संघटनेसाठी हे काम मी स्वतः केले आहे. पक्षाने आम्हाला जे काही काम दिले आहे, ते जिथे फिट केले जाईल, ते काम करू, असे बिप्लब देब म्हणाले. यादरम्यान बिप्लब देब यांना नवीन मुख्यमंत्र्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता, मात्र त्यांनी हे अद्याप माहित नसल्याचे सांगितले. तसेच, हायकमांडच्या सांगण्यावरूनच राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नव्या मुख्यमंत्रीपदासाठी तीन नावे चर्चेत
बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर आता त्रिपुराच्या नव्या मुख्यमंत्र्यांची चर्चा जोर धरू लागली आहे. यासाठी भाजपने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. ज्यामध्ये दिल्लीहून त्रिपुराला गेलेले केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांचा सहभाग असणार आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड होऊ शकते. मात्र सध्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबत तीन नावे समोर येत आहेत. पहिले नाव सध्याचे डेप्युटी सीएम जिष्णू देब वर्मा यांचे आहे, ज्यांच्याकडे पक्षाची कमान सोपवू शकते. त्यांच्यानंतर माणिक साहा आणि प्रतिमा भौमिक यांचीही नावे चर्चेत आहेत.

Web Title: tripura chief minister biplab kumar deb first reaction after resignation party prepare for 2023 election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.