लाईव्ह शोमध्ये मौलानाची महिला वकिलास मारहाण, पोलिसांची स्टुडिओत धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 11:08 IST2018-07-18T11:07:30+5:302018-07-18T11:08:25+5:30

मौलाना एजाज अरशद कासमी यांनी एका वृत्तवाहिनीच्या लाईव्ह चर्चासत्र कार्यक्रमात चक्क महिला वकिलावरच हात उचलला.

Triple Talaq Controversy Maulana Ejaz Arshad Kasami raised hand on lady reporter | लाईव्ह शोमध्ये मौलानाची महिला वकिलास मारहाण, पोलिसांची स्टुडिओत धाव

लाईव्ह शोमध्ये मौलानाची महिला वकिलास मारहाण, पोलिसांची स्टुडिओत धाव

नवी दिल्ली - मौलाना एजाज अरशद कासमी यांनी एका वृत्तवाहिनीच्या लाईव्ह चर्चासत्र कार्यक्रमात चक्क महिला वकिलावरच हात उचलला. फारह फैज असे या महिला वकिलाचे नाव असून मध्यस्थी करणारांनाही कासमी यांनी बाजुला सारत फैज यांच्यावर हात उगारला. या प्रकारामुळे लाईव्ह शो पाहणारे प्रेक्षक चांगलेच बुचकळ्यात पडले. या शोमध्ये ट्रीपल तलाक विषयावर जोरदार चर्चा सुरु होती.

बरेलीतील निदा खान यांना मुस्लीम समाजाने बहिष्कृत केल्याचा फतवाचा जारी करण्यात आला. याबाबत एका वृत्तवाहिनीवर चर्चासत्र सुरु होते. या चर्चेवेळी स्डुडिओत अचानक गोंधळ निर्माण झाला. त्यावेळी मौलाना एजाज अरशद कासमी एकदम भडकले. त्यानंतर, कासमी यांनी या शोमध्ये सहभागी झालेल्या महिला वकिल फराह फैज यांच्यावर हात उगारला. त्यामुळे स्टुडिओतील वातावरण अधिकच तापले. याप्रकरणी तात्काळ पोलिसांनी माहिती देण्यात आली. त्यामुळे पोलिसांनीही लगेचच पोलिस ठाण्यात धाव घेत मौलाना कासमी यांना ताब्यात घेतले. या चर्चेवेळी मौलाना कासमी यांना परंपरावादी असे संबोधण्यात आल्याने त्यांचा पारा चढला होता. कासमी हे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्यही आहेत. दरम्यान, या महिला वकिलानेही मौलाना कसामी यांच्यावर हात उगारल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Triple Talaq Controversy Maulana Ejaz Arshad Kasami raised hand on lady reporter