शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
3
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
4
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
5
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
6
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
7
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
8
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
9
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
10
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
11
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
12
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
13
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
14
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
15
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
16
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

तिहेरी तलाकविरोधी विधेयक पुन्हा लोकसभेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 4:51 AM

विरोधकांची टीका; तरतुदींना घेतला आक्षेप

नवी दिल्ली : तिहेरी तलाकच्या प्रथेला बंदी घालणारे नवे विधेयक मोदी सरकारने शुक्रवारी लोकसभेत मांडले. सरकारने मांडलेले हे विधेयकच मुळी राज्यघटनाविरोधी असल्याचा आरोप करून, त्यावर विरोधी पक्षांनी सभागृहात प्रचंड टीका केली. हे विधेयक मांडले असताना सभागृहात खूप गोंधळही उडाला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात लोकसभेत सादर झालेले हे पहिलेच विधेयक आहे. महिलांना समान हक्क व न्याय मिळविण्यासाठी तिहेरी तलाकविरोधी विधेयक संमत होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी ते मांडताना केले.हे विधेयक सभागृहाच्या मांडण्यास १८६ जणांनी पाठिंबा, तर ७४ खासदारांनी विरोध केला. प्रसाद म्हणाले की, हे विधेयक विशिष्ट धर्माविरोधात असल्याचा आरोप चुकीचा असून, महिलांना न्याय मिळण्यासाठी मांडण्यात आले आहे. तिहेरी तलाकच्या प्रथेवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणल्यानंतरही तिहेरी तलाकची २०० प्रकरणे घडली.काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी विधेयकाला विरोध करताना सांगितले की, तिहेरी तलाकच्या प्रथेला माझा विरोधच आहे. ती प्रथा चुकीचीच आहे. मात्र, त्यावर बंदी घालणारे नवे विधेयक दिवाणी व फौजदारी कायद्यांतील तरतुदींशी विसंगत असल्याने, त्याला माझा विरोध आहे. पत्नीला सोडून देण्याची प्रथा मुस्लिमांमध्ये नव्हे, तर अन्य धर्मीयांमध्येही आढळते. त्यामुळे पत्नीला सोडणाºया प्रत्येक पुरुषाला त्याचा धर्म न पाहता शिक्षा व्हायला हवी.भाजपची विसंगत भूमिका : ओवेसीएआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले की, मुस्लीम महिलांविषयी भाजपला खूप आत्मीयता आहे. मात्र, हाच पक्ष शबरीमाला मंदिरात हिंदू महिलांना प्रवेश देण्याच्या विरोधात आंदोलन करतो. तिहेरी तलाक घेणाऱ्या मुस्लीम पुरुषाला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे. मात्र, असाच गुन्हा करणाऱ्या गैरमुस्लीम व्यक्तीला फक्त एक वर्षाच्या कारावासाचीच तरतूद आहे. म्हणजेच धर्माच्या बाबतीत केंद्र सरकार भेदाभेद करीत आहे. तिहेरी तलाकच्या नव्या विधेयकाला क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे एन. के. प्रेमचंद्रन यांनीही विरोध केला.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकlok sabhaलोकसभा