त्र्यंबकेश्वर पंचायत समिती समोरील वटवृक्ष कोसळला
By Admin | Updated: August 17, 2015 22:38 IST2015-08-17T22:38:41+5:302015-08-17T22:38:41+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील त्र्यंबक पंचायत समिती कार्यालयासमोरील वटवृक्ष अचानक कोसळला आहे. हा वटवृक्ष अत्यंत विशाल व जुनाट असून वारा नाही, पाऊस नाही अशा परिस्थितीत पडल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे.

त्र्यंबकेश्वर पंचायत समिती समोरील वटवृक्ष कोसळला
त र्यंबकेश्वर : येथील त्र्यंबक पंचायत समिती कार्यालयासमोरील वटवृक्ष अचानक कोसळला आहे. हा वटवृक्ष अत्यंत विशाल व जुनाट असून वारा नाही, पाऊस नाही अशा परिस्थितीत पडल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे.वटवृक्षाचे वय साधारणत: १५० ते २०० वर्षांचे असेल कारण वृद्ध सांगतात, पूर्वीच्या काळी बाजारासाठी येणार्या लोकांसाठी वटवृक्षाची सावली उपयुक्त होती. वटवृक्षाखाली बसूनच अनेक विवाह जमले, व्यवहार झाले आणि सुख-दु:खाच्या गप्पा या वटवृक्षाने ऐकल्या असतील. एवढेच नव्हे तर हल्लीदेखील मोर्चे, आंदोलने, धरणे आदि या वटवृक्षाने अनुभवली आहेत. तर दरवर्षी हजारो महिला वटपौर्णिमेला आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे, हाच पती जन्मोजन्मी लाभावा, अशी मागणी करीत असतील. ------