आदिवासी तरुणाने स्पष्टपणे, नाकारली भाजपची उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 07:28 IST2021-03-18T04:53:56+5:302021-03-18T07:28:09+5:30
मणिकंदन यांचे नाव जाहीर होताच काही भाजप नेते त्यांच्या घरी गेले आणि तुम्ही निवडणूक लढवाच, असा आग्रह धरू लागले. पण आपणास राजकारणात रस नाही आणि आपण भाजपचे समर्थकही नाही आहोत, असे सांगून मणिकंदन यांनी सर्वांची बोळवण केली.

आदिवासी तरुणाने स्पष्टपणे, नाकारली भाजपची उमेदवारी
तिरूवनंतपूरम :केरळ विधानसभेसाठी भाजपने जाहीर केलेल्या उमदेवारांच्या यादीत आपले नाव पाहून मणिकंदन नावाच्या आदिवासी तरुणाला धक्काच बसला. राजकारणात येण्याची इच्छा नसल्याने त्याने निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.
मणिकंदन यांचे नाव जाहीर होताच काही भाजप नेते त्यांच्या घरी गेले आणि तुम्ही निवडणूक लढवाच, असा आग्रह धरू लागले. पण आपणास राजकारणात रस नाही आणि आपण भाजपचे समर्थकही नाही आहोत, असे सांगून मणिकंदन यांनी सर्वांची बोळवण केली. मणिकंदन हे केरळमधील पणिया या आदिवासी समूहातील एमबीए झालेले पहिले तरुण आहेत.
तरीही माझे नाव यादीत कसे?
निवडणूक जाहीर होण्याआधीही भाजप नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती आणि तेव्हाही निवडणूक लढवण्याची विनंती केली होती. तेव्हाच मी नकार दिला होता. तरीही माझे नाव यादीत कसे आले, हे समजत नाही, असे मणिकंदन म्हणाले. ते येथील पशुवैद्यकीय व पशुविज्ञान विद्यापीठात सहायक प्राध्यापक आहेत.