कुलभूषण जाधव खटल्याची सुनावणी फेब्रुवारीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 05:30 IST2018-08-23T05:29:35+5:302018-08-23T05:30:00+5:30

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.

The trial of Kulbhushan Jadhav case in February | कुलभूषण जाधव खटल्याची सुनावणी फेब्रुवारीमध्ये

कुलभूषण जाधव खटल्याची सुनावणी फेब्रुवारीमध्ये

इस्लामाबाद : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. त्याविरुद्ध भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली असून या खटल्याची पुढील सुनावणी येत्या फेब्रुवारी महिन्यात होईल. यासंदर्भात एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीने वृत्त प्रसारित केले आहे. जाधवांना सुनावलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालय या खटल्याचा निकाल देईपर्यंत स्थगिती मिळाली आहे. 

Web Title: The trial of Kulbhushan Jadhav case in February