शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्तांवर उपचार करणे डॉक्टरांना सक्तीचे

By admin | Updated: April 1, 2016 03:49 IST

रस्ते अपघातात जखमी होऊन अत्यवस्थ अवस्थेत आणल्या जाणाऱ्या व्यक्तींवर, कोणतीही सबब न सांगता, तातडीने जीवरक्षक उपचार करणे आता देशभरातील डॉक्टरांना सक्तीचे

नवी दिल्ली : रस्ते अपघातात जखमी होऊन अत्यवस्थ अवस्थेत आणल्या जाणाऱ्या व्यक्तींवर, कोणतीही सबब न सांगता, तातडीने जीवरक्षक उपचार करणे आता देशभरातील डॉक्टरांना सक्तीचे झाले असून यात कुचराई करणाऱ्या डॉक्टरांवर ‘व्यावसायिक गैरवर्तना’बद्दल कारवाई होणार आहे.भारतात दरवर्षी रस्ते अपघातांत लाखो लोक जखमी होतात व सुमारे दोन लाख मृत्युमुखी पडतात. अपघातस्थळी धावून येणाऱ्या लोकांना माणुसकीच्या भावनेतून जखमींना मदत करण्याची खूप इच्छा असते; पण पोलिसांना कळविले किंवा जखमींना घेऊन इस्पितळात गेले, तर नसती झंझट मागे लागते म्हणून अनेकजण इच्छा असूनही मदतीला धावत नाहीत. परिणामी अनेकांचे वाचू शकणारे प्राण, वेळेवर उपचार न मिळाल्याने गमावले जातात.सेव्हलाईफ फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने जनहित याचिका करून नेमका हाच विषय सर्वोच्च न्यायालयात मांडला होता. त्यात न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर रस्ते वाहतूक मंत्रालयाने अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणाऱ्या सुहृदांना त्रास होऊ नये व अपघातग्रस्तांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी मार्गदर्शक नियमावली तयार केली. खंडपीठाने बुधवारी ही नियमावली मंजूर केली व कायदा होईपर्यंत देशभर याची अंमलबजावणी केली जावी, असे आदेश दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)नियमावलीतील तरतुदीअपघातग्रस्तांवरील उपचार आणि डॉक्टर व इस्पितळांची जबाबदारी याविषयी नियमावलीत पुढील तरतुदी करण्यात आल्या आहेत : रस्ते अपघातातील जखमी व्यक्तीला, त्याच्या कुटुंबीय/ नातेवाईकाखेरीज अन्य कोणी घेऊन आल्यास कोणतेही इस्पितळ त्याला थांबवून ठेवणार नाही किंवा त्याच्याकडे उपचारांसाठी कोणत्याही प्रकारे पैशाची मागणी करणार नाही.अत्यवस्थ स्थितीत आणल्या गेलेल्या रस्ते अपघातग्रस्तावर तातडीने उपचार करण्यात कुचराई करणे हे संबंधित डॉक्टरचे व्यावसायिक गैरवर्तन मानले जाईल व त्याबद्दल मेडिकल कौन्सिल शिस्तभंगाची कारवाई करेल.अपघातग्रस्तांना घेऊन येणाऱ्यांना थांबवून घेतले जाणार नाही किंवा त्यांच्याकडून कसलेही पैसे घेतले जाणार नाहीत, असे स्पष्ट करणारे फलक सर्व इस्पितळांनी त्यांच्या प्रवेशद्वारांवर ठळकपणे लावावेत.नाव उघड करण्याची सक्ती केली जाणार नाही...- अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून येणाऱ्या आणि त्यांना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीतील प्रमुख तरतुदी अशा :- अशी मदत करणाऱ्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची दिवाणी अथवा फौजदारी जबाबदारी येणार नाही.- इस्पितळ किंवा पोलीस त्याला नाव उघड करण्याची सक्ती करणार नाहीत. फोनवर अपघाताची माहिती देणाऱ्यासही पोलीस नाव सांगण्याची सक्ती करणार नाहीत. याचे पालन न करणाऱ्यांवर खातेनिहाय कारवाई केली जाईल.- इतरांना प्रोत्साहन मिळावे यासाठी अशी मदत करणाऱ्यास सुयोग्य इनाम दिले जाईल.- मदतीला धावून आलेली व्यक्ती अपघाताची प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही असेल, तर पोलीस किंवा न्यायालय फक्त एकदाच बोलावून त्याचा जबाब/साक्ष नोंदवतील. न्यायालयाने शक्यतो प्रत्यक्ष न बोलावता प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात किंवा ‘कमिशन’ पाठवून साक्ष नोंदवावी. साक्षीसाठी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ सेवेचाही जास्तीत जास्त वापर करावा.