राष्ट्रीय वैद्यकीय आयोगामुळे कारभारात येईल पारदर्शकता- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 00:00 IST2021-02-26T23:58:54+5:302021-02-27T00:00:12+5:30
आरोग्यसेवेतही होणार बदल

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगामुळे कारभारात येईल पारदर्शकता- नरेंद्र मोदी
चेन्नई : देशातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवा या क्षेत्रांमध्ये केंद्र सरकारला मोठे बदल घडवायचे आहेत. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगामुळे कारभारात मोठी पारदर्शकता येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
ते म्हणाले की, वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांनी नि:स्वार्थ बुद्धीने आपले काम करायला हवे. डॉ. एमजीआर वैद्यकीय विद्यापीठाच्या ३३ व्या दीक्षांत समारंभप्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुक्रवारी पंतप्रधान मोदी म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण व आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. वैद्यकीय आयोगामुळे कारभारात आणखी पारदर्शकता येईल.
जागा वाढल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, गेल्या सहा वर्षांत एमबीबीएसच्या जागांमध्ये तीस हजारांनी वाढ जाली आहे. २०१४च्या आधीपेक्षा ही वाढ ५० टक्के अधिक आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांतील पदव्युत्तर शिक्षणाच्या २४ हजार जागा वाढल्या आहेत.