शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

‘एनडीआरएफ’ अकादमीत सार्क देशांनाही प्रशिक्षण- अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 3:47 AM

नागपुरातील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय देशाला केले समर्पित

नागपूर : नागपुरात भव्य व अत्याधुनिक अशी एनडीआरएफची (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) अकादमी उभारण्यात येत आहे. ही आशिया खंडातील एकमेव अशी अकादमी आहे. या अकादमीमध्ये दक्षिण आशियातील सार्क देशांमधील नागरिकांनाही अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाईल, त्यामुळे ती सार्क देशांसाठीही फायद्याची ठरेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे व्यक्त केला.राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयातील नवनिर्मित परिसर गुरुवारी राष्ट्राला समर्पित व एनडीआरएफ अकादमीची स्थापना करताना ते बोलत होते. यावेळी अग्निशमन शौर्य पदकांचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, उपस्थित होते.अमित शहा म्हणाले, सध्या अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण झाली आहे. अलीकडे देशात तीन मोठ्या नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडल्या. यात लोकांचे जीव आणि संपत्तीच्या संरक्षणात एनडीआरएफने महत्त्वाची भूमिका बजावली. पूर्वी अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये १० हजारावर लोकांचे बळी जात होते. परंतु आता तसे राहिले नाही. कुठेही नैसर्गिक आपत्ती आल्यास एनडीआरएफ तात्काळ पोहोचते. हे काम केवळ चार वर्षात झाले हे विशेष. आपत्ती निवारण आणि अग्निशमन विभाग हे दोन्ही विभाग गेली ७० वर्षे दुर्लक्षित राहिले. अग्निशमन हा राज्यांचा विषय आहे. राज्यांनीही तो महापालिकेच्या भरवशावर ठेवला. त्यामुळे हे विभाग कायमस्वरुपी दुर्लक्षित राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये या दोन्ही विभागाला मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला. केवळ चार वर्षात एनडीआरएफ देशभरात पसरले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले,आंतरिक व बाह्य सुरक्षेसोबतच जानमालाची सुरक्षाही महत्त्वाची आहे. हेच कार्य अग्निशमन विभाग व एनडीआरएफ करते.पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्यअमित शहा यांनी सांगितले की, पुढील पाच वर्षात ५ ट्रिलियन डॉलरवर अर्थव्यवस्था नेऊन जगात ती १ ते ३ क्रमांकापर्यंत पोहोचवण्याचे आमचे लक्ष्य आहे.नागपुरातील राष्ट्रीय अग्नीशमन सेवा महाविद्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण व एनडीआरएफ अकादमीचे भूमीपूजनप्रसंगी दीप प्रज्वलित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. सोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवर.

टॅग्स :National Disaster Response Forceराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल