रेल्वेनं प्रवास करताना तिकीट हरवलं तरी चिंता नको, करा फक्त एक काम अन् प्रवास होईल सुकर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 19:40 IST2023-03-25T19:31:49+5:302023-03-25T19:40:10+5:30
रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. काहीवेळा असं घडतं की अचानक प्रवास केल्यामुळे तिकिट खिडकीतून आपत्कालीन स्थितीत तिकीट काढावं लागतं.

रेल्वेनं प्रवास करताना तिकीट हरवलं तरी चिंता नको, करा फक्त एक काम अन् प्रवास होईल सुकर!
नवी दिल्ली-
रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. काहीवेळा असं घडतं की अचानक प्रवास केल्यामुळे तिकिट खिडकीतून आपत्कालीन स्थितीत तिकीट काढावं लागतं. अशा परिस्थितीत घाईगडबडीत तुमचं तिकीट कुठेतरी हरवलं तर तुम्ही काय कराल? तुमचं तिकीट हरवलं तर काळजी करण्याची गरज नाही. कारण यासाठी भारतीय रेल्वेनं तुमच्यासाठी एक पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.
रेल्वेचं तिकीट हरवल्यास काय करावं हे जाणून घेऊयात. तसंच तुमचं तिकीट कापलं किंवा फाटलं तरी तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय प्रवास पूर्ण करू शकता आणि टीसी तुम्हाला त्रास देणार नाही.
तिकीट हरवले तर हे काम करा
तुमचे तिकीट हरवलं तर तुम्ही तिकीट खिडकीतून त्याच प्रवासासाठी डुप्लिकेट तिकीट घेऊ शकता. परंतु, तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की तुम्ही फक्त २ अटींवर डुप्लिकेट तिकीट मिळवू शकता एकतर तिकीट कन्फर्म असेल तर किंवा आरएसी म्हणजेच कॅन्सलेशनविरुद्ध आरक्षण तिकीट असेल तरच डुप्लिकेट तिकीट मिळतं.
तिकीट 50 रुपयांना मिळेल
तिकीट हरवल्यास, डुप्लिकेट तिकिटासाठी तुम्हाला स्लीपर श्रेणीसाठी ५० रुपये आणि त्यावरील श्रेणीसाठी १०० रुपये शुल्क द्यावं लागेल. दुसरीकडे, जर तिकीट कापलं गेलं तर तुम्हाला तिकिटाच्या रकमेच्या २५% भरावे लागतील.
रिफंडही मिळवता येतो
जर तुमचं हरवलेलं तिकीट सापडलं आणि तुम्ही डुप्लिकेट तिकीट बनवलं असेल तर तुम्ही तुमच्या डुप्लिकेट तिकिटाचं रिफंड देखील घेऊ शकता. २० रुपये किंवा ५% रक्कम कापल्यानंतर, उर्वरित पैसे तुम्हाला परत केले जातात.
प्रवास केला नाही तरी रिफंड मिळतो
जर तुम्हाला डुप्लिकेट होण्यासाठी वेळ लागला आणि तुम्हाला कोणत्याही कारणामुळे प्रवास करता आला नाही, तर तुम्ही TTE शी संपर्क साधून संपूर्ण घटना TTE ला सांगू शकता. त्याच वेळी, काउंटरवरून घेतलेलं तिकीट परत करून परतावा मिळू शकतो.