Viral VIdeo: बी.टेक विद्यार्थ्याची कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 18:38 IST2025-11-05T18:31:48+5:302025-11-05T18:38:45+5:30
B.Tech Student Suicide: आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये मंगळवारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली.

Viral VIdeo: बी.टेक विद्यार्थ्याची कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये मंगळवारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. बी.टेक द्वितीय वर्षाच्या एका विद्यार्थ्याने कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मृत विद्यार्थ्याचे नाव रुद्र असे असून बी.टेक द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने रुद्रला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने प्रथम स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. अधिक चांगल्या उपचारांसाठी त्याला तामिळनाडूच्या वेल्लोर येथे हलविण्यात आले. परंतु, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आले.
బ్రేకింగ్
— Telugu Feed (@Telugufeedsite) November 4, 2025
చిత్తూరు సీతమ్స్ ఇంజనీరింగ్ కాలేజీలో దారుణం
బీటెక్ సెకండ్ ఇయర్ విద్యార్థి రుద్ర కాలేజీ థర్డ్ ఫ్లోర్ నుంచి దూకి ఆత్మహత్య
హాస్పిటల్ కు తరలించే లోపు మృతి
సరిగ్గా నాలుగు రోజులక్రితం ఇదే కాలేజీలో నందిని రెడ్డి అనే విద్యార్ధిని కాలేజీ సెకండ్ ఫ్లోర్ నుంచి దూకి… pic.twitter.com/wrx6CufiRO
आत्महत्येची ही संपूर्ण घटना कॉलेजच्या आवारात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रुद्र भिंतीवर चढतो आणि त्यावर काही पावले चालतो. त्यानंतर खाली उडी मारतो. चित्तूरचे डीएसपी साईनाथ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली की, रुद्रने प्रेमप्रकरणातून हे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.