Arunachal Pradesh Accident: अरुणाचल प्रदेशात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला, १७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 15:25 IST2025-12-11T15:17:10+5:302025-12-11T15:25:45+5:30
Arunachal Pradesh Accident News: अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यात भीषण अपघात घडला, यात १७ जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Arunachal Pradesh Accident: अरुणाचल प्रदेशात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला, १७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यात भीषण अपघात घडला. कामगारांना घेऊन जाणारा एक ट्रक खोल दरीत कोसळला. अपघाताच्या वेळी ट्रकमध्ये एकूण २१ कामगार होते, यातील १७ जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत आणि बचाव पथके घटनास्थळी पाठवली आहेत.
अंजाव जिल्हा उपायुक्त मिलो कोजिन यांनी या अपघाताची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात एका अतिशय धोकादायक डोंगर वळणावर झाला. अपघातानंतर, जवळच्या गावकऱ्यांनी सर्वप्रथम मदत केली. त्यानंतर पोलीस, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन आणि सैन्य दलांनी बचाव कार्याला सुरुवात केली. ट्रक खोल दरीत कोसळल्याने बचाव कार्य आव्हानात्मक बनले आहे. अनेक कामगार दरीत अडकल्याची माहिती आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागत आहे.
महत्त्वाचे म्हणजे, हा अपघात नेमका कशामुळे झाला? याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाने मृत कामगारांच्या कुटुंबांशी संपर्क साधला असून, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.