मुंबईच्या व्यापार्याच्या खुनाचे गूढ उकलले
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:38+5:302015-01-31T00:34:38+5:30
- दोघांना पंजाबमधून अटक

मुंबईच्या व्यापार्याच्या खुनाचे गूढ उकलले
- ोघांना पंजाबमधून अटकपुणे : सोन्याच्या दागिन्यांची ऑर्डर देण्यासाठी मुंबईहून पुण्याला बोलावून घेत हॉटेलच्या खोलीमध्ये व्यापार्याचा खून करणार्या दोघांना पुणे पोलिसांनी पंजाबमधून जेरबंद केले. रास्ता पेठेतील हॉटेल सुंदरमध्ये १९ जानेवारी रोजी झालेल्या या खुनाचे गूढ एका आठवड्यात उकलण्यात यश आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी दिली.सिमरनजीत सरदार गुरमित सिंग (२६) आणि गुरविंदरसिंग दलजितसिंग (२६, दोघेही रा. अमृतसर, पंजाब) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांनी किरण बाबुलाल कोठारी (३०, रा. चीराबाजार, मुंबई) यांच्याकडे सोन्याच्या नथीची ऑर्डर दिली होती. त्यासाठी कोठारी मुंबईहून पुण्याला आले होते.रास्ता पेठेतील सुंदर लॉजमध्ये २१ जानेवारी रोजी कोठारींचा मृतदेह आढळला होता. डोक्यावर आणि मानेवर वार करून सिमरनजीत आणि गुरविंदरसिंग हे पाच लाखांचा ऐवज आणि पाच हजारांची रोकड घेऊन सुरुवातीला औरंगाबादला गेले. तेथून ते दिल्ली मार्गे अमृतसरला गेले.गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांना लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज मिळाले. या फुटेजच्या आधारे दोघा संशयितांचा माग काढत पोलीस अमृतसरला पोहोचले. हा खून व्यावसायिक संबंधामधील तणावातून करण्यात आल्याचेही भामरे म्हणाले.