शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांना ‘पोलिसी टोल’

By admin | Updated: August 5, 2014 23:37 IST

नाराजीचा सूर : सुरक्षिततेच्या नावाखाली केवळ त्रास

प्रसन्न राणे - सावंतवाड.. वर्षा पर्यटनासाठी आंबोली येथे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात टोल भरून आंबोली येथे जावे लागते. यामुळे याचा आर्थिक फटका पर्यटकांना बसत असल्याने पर्यटकांमध्ये नैराश्य निर्माण होत आहे. पर्यटनाच्या वाढीच्या दृष्टीकोनातून पर्यटकांना होणारा त्रास कमी होण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी मागणी जोर धरत आहे.राज्यात जास्त पावसाचे आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून आंबोलीला ओळखले जाते. आंबोलीमध्ये पावसाळ्यात अनेक छोेटे मोठे धबधबे निर्माण होतात. दाट धुके असल्याने पर्यटक वाट काढत काढत आंबोलीत जाण्यायेण्याचा प्रवास करतात. वर्षभरातून पावसाळी हंगामामध्ये लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देऊन जात असतात. मात्र, या पर्यटकांना आंबोली पर्यटकांसाठी कोणतीच सुरक्षा या हंगामात नसते. याउलट तिठ्यातिठ्यांवर उभे राहून पोलीस या पर्यटकांकडून कागदपत्रांची मागणी करत बराच पैसा वसूल करतानाचे चित्र दिसून येत आहे. बावळाट तिठ्यावर वाहतूक पोलीस व अन्य पोलिसांची बरीच गस्त असते. बावळाट तिठ्यावर गोव्याच्या दिशेने येणाऱ्या गाड्या या आंबोली हंगामात मोठ्या प्रमाणात असतात. याबरोबरच सावंतवाडीच्याही दिशेने येणाऱ्या काही गाड्या येत असतात. मात्र, यावेळी पोलीस जास्तीत जास्त वाहने अडवून सर्व कागदपत्रे तसेच अन्य गोष्टींची तपासणी करत असतात. मात्र, यावेळी कागदपत्रे असूनही कोणते ना कोणते कारण सांगून पैसा उकळण्याचे काम मोठ्या प्रमाणात याठिकाणी सुरू असते. पावसानेही यावर्षी जून महिना पूर्णपणे कोरडाच घालवून जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जोर धरला. यामुळे धबधबे सुरू होईपर्यंत पर्यटकांना दिवसही कमी मिळाले आहेत. यामुळे आंबोली येथील अनेक हॉटेल व्यावसायिकांचेही नुकसान झाले आहे. आंबोली येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी बाचाबाची होत असते. हाणामारीचे प्रकारही घडतात. मात्र, अशावेळी कोणत्याही प्रकारचे पोलीस संरक्षण मिळत नाही. महिलांनाही छेडछाडीसारख्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. मद्यधुंद अवस्थेत काही पर्यटक महिलांची छेडछाड काढतात. आंबोली घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही होते. अशावेळी पोलीस नागरिकांच्या संरक्षणाच्या नावाखाली बावळाट तिठा, बोर्डी पूूल अशा ठिकाणांवर उभे राहून पर्यटकांकडून पैसे वसूल करत असतात. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. यावर योग्य तो निर्णय घेण्याची अपेक्षा पर्यटकांमधून व्यक्त केली जात आहे.