शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

आरबीआय व केंद्रामधील वाद चिघळणार, आता 'हे' दोन अधिकारी आले आमने-सामने 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 11:42 AM

विशेष म्हणजे या वादात मंत्रालयाच्या टॉप अधिका-यांनी आता उडी घेतली आहे.

नवी दिल्ली- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारमधील वाद काही शमण्याचं नाव घेत नाहीये. आरबीआयनं झालेले मतभेद सार्वजनिक केल्यानंतर आता अर्थ मंत्रालयानंही आरबीआयवर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या वादात मंत्रालयाच्या टॉप अधिका-यांनी आता उडी घेतली आहे. त्यामुळे सरकार आणि आरबीआयमधील वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.आर्थिक प्रकरणातील अर्थ मंत्रालयाचे सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी आरबीआयचे उप गव्हर्नर वीरल आचार्य यांच्या विधानावर टिप्पणी केली आहे. त्यानंतर आरबीआयनं आपल्या वेबसाइटवर अन्य उप गव्हर्नर एन. एस. विश्वनाथ यांनी जमशेदपूरमध्ये या आठवड्यात दिलेलं व्याख्यान अपलोड केलं आहे. ज्यात पैशांची उणीव भागवण्यासाठी सरकार कसं अपयशी ठरतंय, याचा दाखला देण्यात आला आहे. बँका मजबूत झाल्याचा फक्त ढिंढोरा पिटला जातोय. परंतु खरी परिस्थिती तशी नाही, असं ते म्हणाले आहेत. मंत्रालयाचे आर्थिक प्रकरणातील सचिव सुभाष चंद्र गर्ग यांच्यावर आरबीआय आणि अर्थमंत्रालयातील संबंध चांगले राहतील, अशी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय बँकेच्या स्वायत्ततेचा सन्मान न करणा-या सरकारांना आज नाही, तर उद्या बाजारातील आक्रोशाला सामोरं जावं लागतं, असं वीरल आचार्य म्हणाले होते. या विधानाचा हवाला देत गर्ग यांनी देशातील आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाही 73वर पोहोचला आहे. तर ब्रेंट क्रूड ऑइलही 73 डॉलरच्या खाली आले आहे.बाजाराची परिस्थिती 4 टक्के सुधारली आहे. बाँड यील्ड्स 7.8 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. हाच बाजारांचा आक्रोश आहे काय, असा प्रश्नही सुभाष चंद्र गर्ग यांनी उपस्थित केला आहे. वीज क्षेत्रातील योजनांमध्ये अडकलेल्या बँकांच्या समस्येच्या समाधानावरून केंद्र आणि आरबीआयमध्ये वाद आहेत. या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्रालयानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला तीन पत्रे पाठवली आहेत. विशेष म्हणजे ही पत्रे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अॅक्ट 7 अंतर्गत पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला आदेश देऊ इच्छितात, अशीही चर्चा आहे. यापूर्वी या कायद्याचा कधीही वापर करण्यात आलेला नाही.  

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकCentral Governmentकेंद्र सरकार