मोदी, कोहली नव्हे 2019 मध्ये भारतीयांनी या व्यक्तीचं नाव केलं गुगलवर सर्वाधिक सर्च 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 04:09 PM2019-12-11T16:09:45+5:302019-12-11T16:09:51+5:30

Flashback 2019 : यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली, अमिताभ बच्चन अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे नाही तर एका वेगळ्याच व्यक्तीचे नाव भारतातून गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले आहे

Top 10 Keywords Searched in Google In Year 2019 | मोदी, कोहली नव्हे 2019 मध्ये भारतीयांनी या व्यक्तीचं नाव केलं गुगलवर सर्वाधिक सर्च 

मोदी, कोहली नव्हे 2019 मध्ये भारतीयांनी या व्यक्तीचं नाव केलं गुगलवर सर्वाधिक सर्च 

Next

नवी दिल्ली - सरत्या वर्षामध्ये अनेक व्यक्तिमत्त्वांनी भारतीय जनमानसावर आपली छाप पाडली. काही प्रस्थापित व्यक्तिमत्त्वांसोबतच अनेक नवे चेहर या वर्षभरात देशवासियांमध्ये चर्चेचा विषय ठरले. या प्रसिद्ध व्यक्तींबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी नेटिझन्सनी त्यांचे नाव मोठ्या प्रमाणावर गुगववर सर्च केले. मात्र यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली, अमिताभ बच्चन अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे नाही तर एका वेगळ्याच व्यक्तीचे नाव भारतातून गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले आहे. 

भारतात यावर्षी सर्वात सर्च केल्या गेलेल्या व्यक्तींची यादी गुगलने प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचे नव्हे तर एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानी विमानांनी केलेला हल्ला परतवून लावणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे नाव भारतातून गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले आहे. 

अभिनंदन यांच्यानंतर लता मंगेशकर, युवराज सिंग, आनंद कुमार,  विकी कौशल, ऋषभ पंत, राणू मंडल, तारा सुतारिया, सिद्धार्थ शुक्ला, कोएना मित्रा यांची नावेही मोठ्या प्रमाणावर सर्च केली गेली.  

भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च झालेली व्यक्तिमत्त्वे  
1) अभिनंदन वर्धमान ( Abhinandan Varthaman)
2) लता मंगेशकर (Lata Mangeshkar)
3) युवराज सिंग (Yuvraj Singh)
4) आनंद कुमार (Anand Kumar)
5) विकी कौशल (Vicky Kaushal)
6) ऋषभ पंत (Rishabh Pant)
7) राणू मंडल (Ranu Mondal)
8)  तारा सुतारिया (Tara Sutaria)
9) सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla)
10) कोएना मित्रा (Koena Mitra)

 सरते वर्ष भारतीयांच्या दृष्टीने अनेक घटनांनी भरलेले राहिले. पुलवामा हल्ला आणि त्यानंतरची एअर स्ट्राइक, लोकसभा निवडणूक,  क्रिकेट विश्वचषकातील भारतीय संघाची कामगिरी, चांद्रयान-2 मोहिम, कलम 370 या घटना देशवासियांच्या मनात ठळकपणे नोंदवल्या गेल्या. मात्र या सर्वांमधून इंटरनेटवर भारतीयांची सर्वाधिक पसंती मिळाली ती क्रिकेटला. सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलने सरत्या वर्षात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झालेल्या गोष्टींची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये भारतीयांना या वर्षात Cricket World Cup बाबत सर्वाधिक सर्च केले. त्यामुळेच गुगलच्या ओव्हरऑल कॅटॅगरीमध्ये या सर्चला पहिले स्थान मिळाले आहे. 

Web Title: Top 10 Keywords Searched in Google In Year 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.