आज रात्री सर्व घाटांची सफाई पालिकेचे नियोजन : शाहीमार्गही करणार चकाचक

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:35+5:302015-08-26T23:32:35+5:30

नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिली पर्वणी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने गोदावरी नदीवरील रामकुंड, तपोवन परिसरासह नव्याने बांधण्यात आलेले सर्व घाट गुरुवारी (दि.२७) रात्री पाण्याने स्वच्छ करण्यात येणार असून शाहीमार्गावरही साफसफाईचे नियोजन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली.

Tonight to clear all the ghats. Municipal planning: The royal route will be chaotic | आज रात्री सर्व घाटांची सफाई पालिकेचे नियोजन : शाहीमार्गही करणार चकाचक

आज रात्री सर्व घाटांची सफाई पालिकेचे नियोजन : शाहीमार्गही करणार चकाचक

शिक - सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिली पर्वणी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने गोदावरी नदीवरील रामकुंड, तपोवन परिसरासह नव्याने बांधण्यात आलेले सर्व घाट गुरुवारी (दि.२७) रात्री पाण्याने स्वच्छ करण्यात येणार असून शाहीमार्गावरही साफसफाईचे नियोजन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली.
येत्या शनिवारी (दि.२९) पहिली शाही पर्वणी असून अवघे दोन दिवस उरल्याने स्वच्छतेच्यादृष्टीने महापालिकेच्या आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली आहे. गुरुवारी रात्री रामकुंड परिसरासह सर्व घाट पाण्याने स्वच्छ धुवून काढण्यात येणार आहेत. त्यासाठी अग्निशामक दलाकडून वाहने मागविण्यात आली आहेत. साधुग्राम, रामकुंड तसेच भाविकमार्ग याठिकाणी महापालिकेने साफसफाईसाठी ३२०० कर्मचारी नियुक्त केले आहेत. आतापर्यंत रामकुंड व साधुग्राम परिसरातीलच स्वच्छतेवर भर दिला जात होता. बुधवारपासून भाविक मार्गावरही साफसफाईला सुरुवात करण्यात आली असून त्यासाठी सुमारे १३०० कर्मचारी कार्यरत आहेत. सदर कर्मचारी आता महिनाभर भाविक मार्गांची सफाई करतील. विविध ठिकाणी ३६० कर्मचारी पर्यवेक्षणासाठी तर चार नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आले आहेत. भाविकमार्ग, रामकुंड परिसर, साधुग्राम याठिकाणी कचरा संकलनासाठी १३ घंटागाड्या कार्यरत असून रात्री १२ ते ६ या वेळेतच कचर्‍याची वाहतूक खतप्रकल्पावर केली जात आहे. बा‘ वाहनतळांवर २०० मीटरला एक डस्बीन व ८०० मीटरला १ व्हील बरोज उपलब्ध करून देण्यात आले आहेत तर अंतर्गत वाहनतळ आणि घाटांवर १०० मीटरला एक डस्बीन आणि २ व्हील बरोज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. २५ कर्मचार्‍यांमागे एक निरीक्षक कार्यरत असेल. साधुग्राम, रामकुंड परिसरात जंतुनाशक फवारणी केली जात आहे. त्यासाठी जंतुनाशकांचा आवश्यक तो साठा उपलब्ध आहे. स्पे्रईंग, फॉगिंगसाठी साधुग्राममध्ये सहा पथके कार्यरत असून प्रत्येक पथकात चार कर्मचार्‍यांचा समावेश असल्याचेही डॉ. डेकाटे यांनी सांगितले.
इन्फो
हॉटेलचालकांनाही सूचना
अन्न व औषध प्रशासनाकडे बुधवारी शहरातील हॉटेलचालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. यावेळी हॉटेलचालकांना स्वच्छतेबाबत सूचना देण्यात आल्या. हॉटेलचालकांनी शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, कचरा संकलन व्यवस्थित करून त्याची वेळेत घंटागाडीच्या माध्यमातून विल्हेवाट लावावी. प्लॅस्टिक बंदीचे काटेकोर पालन करावे. रोज अन्नाची तपासणी करून घ्यावी आदि सूचनांचे पालन न करणार्‍यांवर कडक कारवाईचाही इशारा बैठकीत देण्यात आला.

Web Title: Tonight to clear all the ghats. Municipal planning: The royal route will be chaotic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.