शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा नाद करायचा नाय! टोमॅटो विकून 45 दिवसांत केली 4 कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 15:41 IST

Tomato Farmer Success Story: आंध्र प्रदेशातील एका शेतकऱ्याने टोमॅटो विकून 45 दिवसांत 4 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Tomato Farmer Success: मागील काही दिवसांपासून देशभरात टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सामान्य नागरिकांना याचा फटका बसत असला तरी, शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे. टोमॅटो विकून देशातील अनेक शेतकरी मालामाल झाले आहेत. अशा शेतकऱ्यांच्या अनेक बातम्याही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. यातच आता आंध्र प्रदेशातील एका शेतकऱ्याने टोमॅटो विकून कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.

45 दिवसांत 4 कोटींची कमाईमिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील 48 वर्षीय शेतकरी मुरली यांनी टोमॅटो विकून अवघ्या दीड महिन्यात 4 कोटींची कमाई केली आहे. मीडियाशी बोलताना मुरली म्हणाले की, ते गेल्या आठ वर्षांपासून टोमॅटोची शेतकरी करत आहेत, पण यापूर्वी त्यांना कधीच इतके पैसे मिळाले नाही. मुरली सांगतात की, टोमॅटोची विक्री करण्यासाठी ते 130 किमीचा प्रवास करत कोलारमध्ये जात आहेत. स्थानिक बाजारपेठेत त्यांना चांगला भाव मिळत नाहीये.

कुटुंबाला कर्जातून बाहेर काढलेचित्तूर जिल्ह्यातील करकमंडला गावाचे रहिवासी मुरली संयुक्त कुटुंबात राहतात. त्यांना वारसाहक्काने 12 एकर जमीन मिळाली होती, तर काही वर्षांपूर्वी त्यांनी आणखी 10 एकर जमीन खरेदी केली. गेल्या वर्षी जुलैमध्ये टोमॅटोचे भाव कोसळल्याने त्यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले होते. त्यांच्यावर दीड कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यांनी बियाणे, खते, मजुरी, वाहतूक आणि इतर गोष्टींवर हा खर्च केला होता. 

या कर्जामुळे त्यांचे कुटुंब खूप मानसिक त्रासात होते. पण, यंदा टोमॅटोला चांगला भाव मिळाल्यामुळे त्यांचे नशीब पालटले. यावर्षीचे पीक दर्जेदार असून आतापर्यंत 35 पीकं काढणी झाल्याचे त्यांनी सांगितले. आणखी 15-20 पिके येण्याची अंदाज आहे. मुरली यांनी मिळालेल्या पैशातून सर्व कर्ज फेडल्यानंतरही त्यांच्याकडे 2 कोटी रुपये शिल्लक आहेत. मुरली यांचा मुलगा इंजिनीअरिंग तर मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशFarmerशेतकरीMONEYपैसाvegetableभाज्या