काँग्रेस कार्यकारिणी समितीची आज बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 06:25 IST2019-03-25T06:20:58+5:302019-03-25T06:25:03+5:30
काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक सोमवारी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोलावली असून जाहीरनामा तयार करणारी समिती निवडणूक जाहीरनाम्याला मान्यतेसाठी या बैठकीत सादर करू शकेल.

काँग्रेस कार्यकारिणी समितीची आज बैठक
नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक सोमवारी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोलावली असून जाहीरनामा तयार करणारी समिती निवडणूक जाहीरनाम्याला मान्यतेसाठी या बैठकीत सादर करू शकेल. हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या तारखेवरही या वेळी निर्णय घेतला जाईल. पक्ष सूत्रांनुसार कार्यकारिणी समिती सोमवारीच निवडणूक प्रचार मोहीम आणि त्यासाठी तयार केले गेलेले साहित्य देण्याचे धोरण तयार करील.