शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

आज कुमारस्वामी सरकारचा शेवटचा दिवस, येडियुरप्पांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 09:18 IST

गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा अद्याप शेवट झालेला नाही.

बंगळुरू - गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा अद्याप शेवट झालेला नाही. दरम्यान, कुमारस्वामी सरकारने सादर केलेल्या विश्वासमत प्रस्तावावर आज मतदान होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे कर्नाटकचे भाजपा प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा यांनी आजचा दिवस हा कुमारस्वामी सरकारचा शेवटचा दिवस असल्याचा दावा यांनी केला आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार अडचणीत आले आहे. हे सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. कुमारस्वामी यांनी बंडखोर आमदारांना सभागृहात येऊन भाजपाचे पितळ उघडे पाडण्याचे आवाहन केले आहे. मात्र संबंधित बंडखोर आमदारांनी विधानसभा सभागृहात येण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.  यादरम्यान, काँग्रेस-जेडीएस सरकारचा पाठिंबा मागे घेणाऱ्या दोन अपक्ष आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन कुमारस्वामी सरकारला विधानसभेत तत्काळ बहुमत चाचणी घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.  ही याचिका आज सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयासमोर येण्याची शक्यता आहे. 

आर. शंकर आणि एच. नागेश या अपक्ष आमदारांचे वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, या आमदारांनी 22 जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती आपल्या अर्जाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.  दरम्यान, बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी अपयशी ठरलेल्या काँग्रेस-जेडीएस सरकारने शेवटचा पत्ता खोलला असून, मुख्यमंत्रीच बदलण्याचा प्रस्ताव दिला आहे. या बंडखोरांनी राजीनामा देताना कुमारस्वामींनाच जबाबदार ठरविले होते. यामुळे या आमदारांचे मतपरिवर्तन करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव दिला आहे.  या आमदारांनी सध्याच्या राजकीय संकटासाठी कुमारस्वामी आणि त्यांच्या भावाला दोषी धरले होते.    

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामीYeddyurappaयेडियुरप्पाcongressकाँग्रेसBJPभाजपाJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)