Todays Gold-Silver Rate: रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे सोने अन् चांदीच्या दरात चढ- उतार; आजचा भाव किती?, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 15:20 IST2022-03-24T15:18:11+5:302022-03-24T15:20:01+5:30
युद्धामुळे महागाईने कळस गाठल्याने अनेकांनी उदरनिर्वाहासाठी नवीन सोने खरेदीपेक्षा मोडण्यावर भर दिल्याचे सराफा बाजारातील वातावरण आहे.

Todays Gold-Silver Rate: रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे सोने अन् चांदीच्या दरात चढ- उतार; आजचा भाव किती?, जाणून घ्या
मुंबई- रशिया-युक्रेन युद्धामुळे शेअरबाजारात होणाऱ्या पडझडीमुळे सोन्याच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. प्रतितोळा पन्नास हजारांच्या वर गेल्याने सोने खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. तर, युद्धामुळे महागाईने कळस गाठल्याने अनेकांनी उदरनिर्वाहासाठी नवीन सोने खरेदीपेक्षा मोडण्यावर भर दिल्याचे सराफा बाजारातील वातावरण आहे.
रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत त्याच्या दरात अनेक वेळा चढ-उतार झाली. या कालावधीत सोन्याचे प्रतितोळा दर २ ते ३ हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सध्या सोन्याचा दर प्रतितोळा ५१ हजाराच्यावर गेला आहे.
MCXवर आज सोन्याचे दर ०.३३ रुपयांनी म्हणजेच ०.०६ टक्क्यांनी वाढल्यानंतर ५१,८०० रुपयांवर आहेत आणि MCX वर २७ रुपयांनी घसरल्यानंतर चांदीचा दर ६८,२३७ रुपये प्रति किलोच्या दरांवर व्यवहार करत आहे.
सोने चांदीचे भाव
वर्ष सोने (प्रति तोळा) चांदी (प्रति किलो)
२०२० -४२००० -६२०००
२०२१ -४८०००-६५०००
२०२२- ५१६००- ६९०००
...म्हणून वाढले सोने माेडण्याचे प्रमाण
सोन्याच्या किमतीत प्रतितोळा जवळपास १५ ते २० हजार रुपये इतकी वाढ झाली आहे. प्रमाणित अर्थात २४ कॅरेट सोन्याच्या किंवा बिस्किटांचा भावसुद्धा तितकाच असतो. त्यामुळे कमी किमतीत घेतलेले सोने वाढीव दराने विकून नफा कमाविण्याच्या उद्देशाने ते विकण्याचे प्रमाण वाढले आहे.