नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ झालेली नव्हती. मात्र आता पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता आहे. सोमवारी (8 जून) पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल महागले आहे. मुंबईत आज पेट्रोल 58 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 79.49 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 58 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 69.37 रुपयांवर गेला आहे.
दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर 60 पैशांनी तर डिझेलचे दर 60 पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 72.46 रुपये आणि 70.59 रुपये मोजावे लागतील. गेल्या 80 दिवसांत पहिल्यांदा रविवारी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली होती. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 60-60 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा महाग झाले आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलची मागणीत सुधारणा होत आहे. याच दरम्यान कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 40 डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान जवळपास गेल्या 80 दिवसांत तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल केला नाही. 16 मार्च रोजी इंधनाच्या किंमतीत बदल झाला होता. त्यानंतर रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत प्रति लिटर 60-60 पैशांची वाढ करण्यात आली.
लॉकडाऊन दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील चढ-उतारांना राज्य सरकार जबाबदार आहेत. राज्यांचा महसूल वाढवण्यासाठी व्हॅट किंवा सेसमध्ये वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ नोंदवली आहे. मे महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये आणि डिझेलवर 13 रुपये प्रतिलिटर वाढ केली. यानंतरही दोन्ही इंधनांच्या किरकोळ किंमतीत कोणताही बदल झाला नाही. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये झालेला बदल कच्च्या तेलाच्या किंमतींच्या आधारे ठरविला जातो. कारण 80 टक्के कच्चे तेल आयात करतो.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : ब्लड प्रेशर असलेल्या कोरोनाग्रस्तांना 'ही' चूक पडेल महागात; वेळीच व्हा सावध
मद्यप्रेमींसाठी खूशखबर! दारू स्वस्त होणार, 'कोरोना शुल्क' हटवणार; 'या' सरकारने घेतला निर्णय
30 जून आधी पूर्ण करा 'ही' 7 महत्त्वाची कामं, नाहीतर होईल मोठं नुकसान
CoronaVirus News : ...म्हणून कोरोना पॉझिटिव्ह महिलेने बाळाचं नाव ठेवलं 'सॅनिटायझर'
CoronaVirus News : शिक्षणासाठी काय पण! 'या' मुलीच्या जिद्दीला तुम्हीही कराल सलाम