शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
4
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
5
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
6
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
7
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
8
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
9
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
10
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
11
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
12
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
13
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
14
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
15
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
16
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
17
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
18
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
19
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
20
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...

५० टक्के राज्यांच्या विधानसभेची मंजूरी आवश्यक; महिला आरक्षण विधेयकावर आज दीर्घ चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 08:33 IST

महिला आरक्षणाच्या विधेयकावर आज सत्ताधारी आणि विरोधक महिला आरक्षणाच्या विधेयकावर आपली मते मांडतील.

नवी दिल्ली: संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांत पारित करण्याची तयारी सरकारने पूर्ण केली आहे. लोकसभेत आज 'नारी शक्ती वंदन' विधेयकावर दीर्घ चर्चा होणार आहे. 

महिला आरक्षणाच्या विधेयकावर आज सत्ताधारी आणि विरोधक महिला आरक्षणाच्या विधेयकावर आपली मते मांडतील. काँग्रेसच्या सदस्या सोनिया गांधी आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चेसाठी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख वक्त्या असतील. त्याचवेळी लोकसभेत सरकारच्यावतीने चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, भारती पवार आणि अपराजिता सारंगी बोलतील आणि संसदेत सरकारची बाजू मांडतील.

महिला आरक्षण देणारे घटना दुरुस्ती विधेयक संसदेने मंजूर करून कायदा बनण्याआधी या विधेयकाला ५० टक्के राज्यांच्या विधानसभेची मंजुरी आवश्यक आहे. घटना दुरुस्ती विधेयक असल्याने कलम ३६८ अन्वये तसे करणे अनिवार्य आहे. नवीन जनगणनेनंतर मतदारसंघांची पुनर्रचना केल्यानंतरच महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. तशा तरतुदी १२८व्या राज्यघटना दुरुस्ती विधेयकात समाविष्ट करण्यात आल्या होत्या. आधी जनगणना होईल व त्यानंतर परिसीमन आयोग केला जाईल. त्या आयोगाच्या अहवालानंतर जागांची संख्या वाढेल. 

विधेयकात काय? 

५४३ सदस्यांच्या लोकसभेत महिला सदस्याची संख्या ७८ वरून १८१ वर जाईल. तसेच विधानसभांतही महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव होतील. विधेयकात १५ वर्षांसाठी आरक्षणाची तरतूद असून ती वाढवण्याचा अधिकार ससदेला असेल. महिलांसाठी राखीव जागांवरही अनुसूचित जाती / जमातीसाठी आरक्षण असेल.

देवानेच माझी निवड केली- पंतप्रधान मोदी

महिलांचे सबलीकरण तसेच अशी अनेक उत्तम कामे करून घेण्य देवाने माझी निवड केली आहे. संसद, विधीमंडळामध्ये महिलांना आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक संसदेत मंगळवारी मांडण्यात आले. त्यामुळे १९ सप्टेंबरची नोंद इतिहासात अतिशय महत्वाचा दिवस म्हणून होईल. नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर करून सर्व खासदारांनी नव्या संसद भवनाचे प्रवेशद्वार उघडून द्यावे. सर्वसंमतीने कायदा झाल्यास त्याची ताकद अनेकपटींनी वाढेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

टॅग्स :Women Reservationमहिला आरक्षणlok sabhaलोकसभाCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीreservationआरक्षण