शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

Aadhar-Pan Link : आजच जोडा आधार-पॅन; नाहीतर लटकेल 'इन्कम टॅक्स'चं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2018 11:05 IST

आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी जोडणं केंद्र सरकारने गेल्या वर्षी बंधनकारक केलं आहे.

नवी दिल्लीः आपलं आधार कार्ड तुम्ही अजून पॅन कार्डशी जोडलं नसेल तर आजच्या आज हे काम करून टाका. अन्यथा, तुम्हाला प्राप्तिकर विवरणपत्र ऑनलाइन भरता येणार नाही आणि तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न अडकू शकेल. 

आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी जोडणं केंद्र सरकारने गेल्या वर्षी बंधनकारक केलं आहे. त्यासाठीच मुदत चार वेळा वाढवून देण्यात आलीय. या जोडणीसाठी 31 मार्च 2018 पर्यंत वेळ देण्यात आला होता. पण नंतर ही मुदत वाढवून 30 जून करण्यात आली होती. त्यामुळे हे काम आजच्या आज करणं गरजेचं आहे. आधार-पॅन लिंक न केल्यास करदात्याचं पॅन कार्ड रद्द केलं जाऊ शकतं.  

असं जोडा आधार-पॅन

1. सगळ्यात आधी प्राप्तिकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर जा. 

2. होमपेजवर 'लिंक आधार' लिहिलेली लाल रंगाची एक पट्टी दिसेल. 

3. या पेजवर तुम्हाला आधार आणि पॅन कार्डवरील माहिती माहिती भरायची आहे.

4. आधार कार्डवर जन्मतारखेपुढे फक्त जन्मवर्ष असेल तर 'I have only year of birth in Aadhar card' सिलेक्ट करा.  

5. captcha code एन्टर केल्यावर आपलं आधार-पॅन जोडल्याचा मेसेज स्क्रीनवर दिसेल. captcha code सोबतच तिथे 'Request OTP'चा पर्यायही देण्यात आला आहे.  

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स