आजचा अर्थसंकल्प म्हणजे आकडे दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न : जलील
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 16:47 IST2020-02-01T16:47:11+5:302020-02-01T16:47:26+5:30
आज देशात नागरिकांच्या आरोग्य आणि हॉस्पिटल यांची काय अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहे , हे सुद्धा सर्वांना माहित असल्याचे जलील म्हणाले.

आजचा अर्थसंकल्प म्हणजे आकडे दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न : जलील
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मता सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला. अडीच तासांपेक्षा अधिक कालावधी हा अर्थसंकल्पाचे वाचन करण्यासाठी लागला. भाजप सरकारच्या अर्थसंकल्पावरून राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहे. तर केंद्र सरकराने आज जाहीर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आकडे दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याची टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले की, भाजपला सत्तेत येऊन 6 वर्षे झाली आहेत, मात्र या काळात त्यांनी काय कामे केली आहे हे सर्वांना माहित आहे. आज देशात नागरिकांच्या आरोग्य आणि हॉस्पिटल यांची काय अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहे , हे सुद्धा सर्वांना माहित असल्याचे जलील म्हणाले.
मात्र असे असताना सुद्धा फक्त आकडे दाखवायचे जेणेकरून लोकांना अशी आकडे आयकून वाटायला पाहिजे की सरकार किती काम करत आहे. पण प्रत्यक्षात स्थानिक पातळींवर काय होत आहे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे आजचा अर्थसंकल्प म्हणजे एक जुमला बजेट प्रेझेंटेशन असल्याचा खोचक टोलाही त्यांनी केंद्र सरकाराला लगावला.