खळबळजनक! बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये TMC नेते सत्येन चौधरी यांची गोळ्या झाडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 16:27 IST2024-01-07T16:24:05+5:302024-01-07T16:27:59+5:30
सत्येन हे एकेकाळी अधीर रंजन चौधरी यांच्या जवळचे होते, पण नंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

फोटो - आजतक
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये TMC नेते सत्येन चौधरी यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. बहारामपूरच्या चलटियामध्ये रविवारी दुपारी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक बाईकवरून आले आणि त्यांनी टीएमसी नेत्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर सत्येन चौधरी यांना मुर्शिदाबादला नेण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्येन हे एकेकाळी अधीर रंजन चौधरी यांच्या जवळचे होते, पण नंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अलीकडे सत्येन हे सत्ताधारी पक्षापासून लांब राहत होते. रविवारी दुपारी, काही लोकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
सत्येन चौधरी यांच्यावर हल्लेखोरांनी जवळून गोळ्या झाडल्या. गोळी झाडल्यानंतर त्यांना तातडीने मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून परिसरात खळबळ उडाली आहे.