मांढळ....

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:19+5:302015-02-15T22:36:19+5:30

ग्रामीणांचे जीणे शहरी लोकांपेक्षा लाखपट चांगले

Tired ... | मांढळ....

मांढळ....

रामीणांचे जीणे शहरी लोकांपेक्षा लाखपट चांगले
चंद्रकांत वानखडे : श्री लेमदेव पाटील महाविद्यालयाचे रासेयो शिबिर उत्साहात
मांढळ : ग्रामस्वच्छतेच्या नावाखाली आपण ग्रामस्थांनाच स्वच्छतेचे धडे देतो; पण परभारे चालणाऱ्या शहरी स्वच्छतेपेक्षा खेड्यापाड्यातील जीणे लाखपट चांगले असते, असे सांगत स्वच्छता अभियानात ग्रामीणांच्या मूळ समस्यांवर विचार-चिंतन होणे गरजेचे आहे. शहरी-ग्रामीण भेद करताना आपण आता आवडती-नावडती अशी भूमिका सोडली पाहिजे, असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत चंद्रकांत वानखडे यांनी केले.
नजीकच्या अडम येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराच्या समारोपीय समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी भोजराज चारमोडे होते. मांढळ येथील श्री लेमदेव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे अडम येथे ग्रामस्वच्छता अभियानासाठी युवाशक्ती या संकल्पनेवर आधारित रासेयोचे विशेष हिवाळी शिबिर नुकतेच पार पडले. यावेळी माजी मंत्री डॉ. श्रावण पराते, रातुम नागपूर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. श्याम माधव धोंड, डॉ. चक्रधर तितरमारे, उपसरपंच गुणाकर सेलोकर आदी उपस्थित होते.
या सात दिवसीय शिबिराचे उद्घाटन आ. सुधीर पारवे यांनी केले. अध्यक्षस्थानी चैतन्येश्वर शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बाबा पाटील तितरमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून रातुम नागपूर विद्यापीठाचे रासेयो समन्वयक डॉ. भाऊ दायदार, तहसीलदार प्रताप वाघमारे, सरपंच कल्याणी गजभिये, रामदास हारगुडे, चिरकूट हारगुडे, उपासराव भुते आदी उपस्थित होते. शिबिरार्थ्यांनी श्रमदानातून २५ शौचालयाचे शोषखड्डे तयार केले. संपूर्ण गावातील गटारे व नाल्यांमध्ये तुंबलेला गाळ उपसून काढला. रस्ते व सार्वजनिक ठिकाणी घनकचऱ्याने व्यापलेल्या जागा स्वच्छ करून गावकऱ्यांना स्वच्छतेचे धडे दिले. ३०-४० मीटरचा रस्ता रहदारीसाठी मोकळा करून दिला.

Web Title: Tired ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.